रानभाजी - कुरडू

 

रानभाजी - कुरडू  

शास्त्रीय नाव : Celosia Argentina

वृत्त एकसत्ता न्यूज 

संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे 

दिनांक 22 ऑगस्ट 2024 : 

कुरडू रानभाजी हे एक प्रकारचं तण असतं. ही भाजी डोंगरात मिळते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ ही पालेभाजी दिसू लागते. कुरडूच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. चव साधारण माठाच्या भाजी प्रमाणेच असते.

पाककृती

# साहित्य - दोन जुड्या कुरडूची भाजी. भाजीचे पाने खुडून घेऊन धुवून तिन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. दोन कांदे बारीक चिरुन. लसुण पाकळ्या ठेचून. हिरव्या मिरच्या. हिंग. हळद. एक टोमॅटो बारीक चिरुन. पाव वाटी ओलं खोबरं खरडवुन. मिठ. दोन चमचे तेल.

# कृती - सर्वप्रथम भांड्यात तेल गरम करुन लसूण, मिरची फोडणीला टाकावी. मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. लगेच टोमॅटो आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेउन जरा वेळ शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मिठ घालावे. परत चांगलं परतवून घेऊन ३-४ मिनीटांनी ओलं खोबरं घालावं व गॅस बंद करावा. आवडत असेल तर भिजवलेली चणाडाळ, भिजवलेली मुगडाळ घालुनही ही भाजी करता येते. टोमॅटोच्या ऐवजी अर्धा लिंबूही चालेल.

संदर्भ : इंटरनेट

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या