"संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी वर कर्ज काढून खाजगी कारखानदारी चालवावी लागते"- राजेंद्र गिरमे

 


"संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी वर कर्ज काढून खाजगी कारखानदारी चालवावी लागते"- राजेंद्र गिरमे

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 10 ऑगस्ट 2024 :

 सहकारी साखर कारखान्यांना शासनाकडून मिळते तसे कर्ज,  अनुदान खाजगी साखर कारखान्यांना मिळत नसल्याने आम्हाला संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज काढून साखर कारखाना चालवावा लागतो. त्यामुळे काही वेळेस कामगारांचे पगार त्याचबरोबर गाळप झालेल्या उसाचे पेमेंट वेळेवर करण्यास अडचण येते तरीही कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य आम्हाला लाभत असल्याने ऊस गळीत हंगाम यशस्वी पूर्ण करीत आलेलो आहोत असे विचार  दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे यांनी व्यक्त केले.

माळीनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील देशातील पहिला खाजगी साखर कारखाना दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेडचा सिझन 2024-25 ऊस गाळप हंगामाचा मिल रोलर पूजन शुगरकेन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे बोलत होते.

अवर्षणामुळे ऊस लागवड क्षेत्र कमी असतानाही ऊस उत्पादक सभासद आणि कारखान्याचे कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने नेहमीप्रमाणे येणारा गळीत हंगाम आपण सर्वजण मिळून यशस्वी करणार आहोत असे होल टाइम डायरेक्टर  परेश रावत यांनी याप्रसंगी म्हटले.

मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे, होल टाईम डायरेक्टर परेश राऊत, कारखान्याचे संचालक नीलकंठ भोंगळे, निखिल कुदळे, नंदकुमार गिरमे, माळीनगर एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन नितीन इनामके, सेक्रेटरी अजय गिरमे, संचालक पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके, शुगर केन सोसायटीचे संचालक जयवंत चौरे भागधारक दीपक गायकवाड सिकंदर जगताप यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी कारखान्याचे सभासद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या