विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 1/11/2026 :
आपण आपल्या मित्रांबरोबर असलो, की थोडे मोकळेढाकळे बोलले जाते आणि वागलेही जाते. पण कधी कधी आपण थोडे जास्तच मोकळे होतो. आपले वय आणि आपले वागणे-बोलणे याचा मेळ बसत नाही व मोठ्या माणसांना ते नक्कीच खटकते.
मग 'ही पिढी कशी बिघडली आहे', 'यांना कसे वळण नाही' याची चर्चा सुरू होते. 'आमच्या वेळेस असे नव्हते' येथपासून सुरू झालेली चर्चा थेट आई-वडिलांपर्यंत येते. 'त्यांनी मुलांवर संस्कार केले नाहीत, चांगले वळण लावले नाही', असा समाजाचा एकमताने शिक्कामोर्तब होतो.
मुलांनो, केवळ आपल्या गैरवर्तनाने आपल्या आई-वडिलांना विनाकारण दोषी धरले जाते. ते आपल्याला कधी असे वागायला शिकवतात का? मित्रांच्या सहवासात किंवा समाजातील काही चुकीच्या गोष्टींचे तुम्ही अनुकरण करत असाल, तर यात दोष कोणाचा?
आपल्या गैरवर्तनाला आपण स्वतःच जबाबदार असतो, दुसरे कोणीही नाही. आपल्या आई-वडिलांना समाज दोषी ठरवेल, असे कधीही वागू नका.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या