विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/11/2026 :
आता दिवाळीची सुट्टी लागणार म्हणून खूश असाल ना? सुट्टीचे बेतही ठरवले असतील. त्यात मामाच्या गावाला जायचे तर पक्केच असेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दिवाळीचा किल्ला आणि फटाके! होय ना?
किल्ला तयार करताना एखादी संकल्पना (थीम) घ्या. कोणता गड करायचा त्याची प्रतिकृती पाहा. अगदी तसा नाही जमला, तरी बऱ्यापैकी साम्य असेल असा किल्ला बनवा. त्यानिमित्ताने त्या गडाचा अभ्यासही होईल.
मुलांनो, फटाके मात्र अगदी अल्प प्रमाणात उडवायचे बरं का! 'उडवूच नका' म्हटले तर तुम्ही ऐकणार नाही; पण प्रदूषण टाळायचे असे आपले ठरले आहे ना? त्यामुळे कमी धूर करणारे व कमी आवाजाचे थोडेसेच फटाके आणायचे.
फटाकेमुक्त दिवाळीसुद्धा आनंदाने साजरी करता येते का, याचा अनुभव नक्की घ्या!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या