मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/11/2026 :
अनेकदा घरात सर्व व्यवस्थित असते, कशाचीही कमतरता नसते; तरीसुद्धा घरातील वातावरण आनंदी असतेच असे नाही. मनावर कशाचा ना कशाचा तरी ताण असतो. एक व्यक्ती जरी असमाधानी असेल, तरी पूर्ण कौटुंबिक वातावरणावर त्याचा दुष्परिणाम जाणवतो.
कधी नोकरीतील किंवा व्यवसायातील ताण असतो, तर कधी परस्पर मतभेद असतात. कधी एकमेकांबद्दल अविश्वास असतो, तर कधी संशयाचे भूत मानेवर बसलेले असते.
अशा वेळी घरातील ज्येष्ठ मंडळी व लहान मुले नाहक या दूषित मानसिकतेचे बळी ठरतात. ते व्यक्त होत नसले, तरी त्यांच्याही मनावर ताण राहतो; त्यांना सतत काळजी वाटते आणि मुले गप्प-गप्प होतात.
आजचा संकल्प
विनाकारण कौटुंबिक वातावरण दूषित करण्यापेक्षा काही गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर हाताळू, तर काही गोष्टी सोडून देऊ आणि सर्वांप्रमाणेच आपलेही मानसिक आरोग्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या