विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/10/2026 :
तुमचे आताचे शालेय वय असे आहे की, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींचे आपण सहज अनुकरण करतो. त्यांच्या चालण्या-बोलण्याची आणि वागण्याची नकळत नक्कल करू लागतो. ते केसांचा भांग कसा पाडतात, कपडे कोणत्या फॅशनचे घालतात किंवा त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबी आपल्याला आवडू लागतात.
विशेषतः चित्रपटसृष्टीतील नटनट्यांचे बाह्य अनुकरण केल्याने आपण ती व्यक्ती बनू शकत नाही; हे केवळ आपले क्षणिक समाधान असते. त्यामुळे एखाद्या कपड्याची किंवा हेअरस्टाईलची तात्पुरती फॅशन येते आणि आपण ती करून तात्पुरता आनंद मिळवतो.
मुलांनो, अनुकरण करायचेच असेल, तर माणसाच्या बाह्य रूपाचे नव्हे, तर त्याच्यातील श्रेष्ठ गुणांचे करा! अफाट शौर्य व धैर्य दाखवून देशासाठी प्राणांची बाजी लावणारे आपले शूर वीर जवान, समाजासाठी रात्रंदिवस झटणारे प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि आपल्याला ज्ञान देऊन घडवणारे आदर्श शिक्षक हे आपले खरे नायक आहेत; त्यांचे अनुकरण करा आणि देश घडवा!
आपल्या जीवनात दिशा दाखवणाऱ्या खऱ्या कर्तृत्ववान व आदर्श व्यक्तींचेच अनुकरण करा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या