🟣 माळशिरस तालुक्यात शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तीमय उत्साहात प्रारंभ 🟠 शिवभवानी नवरात्रोत्सव मंडळात पहिली मानाची आरती संपन्न



🟣 माळशिरस तालुक्यात शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तीमय उत्साहात प्रारंभ
🟠 शिवभवानी नवरात्रोत्सव मंडळात पहिली मानाची आरती संपन्न  

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज 
आकाश भाग्यवंत नायकुडे 
अकलूज दिनांक 11/10/2026  : माळशिरस तालुक्यात शारदीय नवरात्रोत्सवाचा भक्तीमय उत्साहात प्रारंभ झाला असून सकाळपासूनच घरोघर घटस्थापना होत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आपापल्या नियोजित स्थळी श्री देवीच्या मूर्तीची यथासांग पूजा विधी सह स्थापना करण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळं आपापल्या परीने देवी मंदिर तीर्थस्थाना पासून ज्योत आणण्याचे कार्य सांघिक पद्धतीने पूर्णत्वास नेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एकूणच आज रविवार दिनांक 11//10/2026 रोजी सकाळपासूनच अत्यंत मंगलमय भक्तीपूर्ण वातावरणात घटस्थापना तसेच श्री देवी मूर्ती स्थापना होत आहे.


(महाआरती नंतर टिपलेल्या छायाचित्रांमध्ये (उजवीकडून) सुनील ज्ञानेश्वर कांबळे, आप्पा निवृत्ती मोरे, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सदुभाऊ ज्ञानोबा धाईंजे, सौ सखुबाई सदुभाऊ धाईंजे.) फोटो  : ओम सुनील कांबळे

(✒️ गतवर्षी दिनांक 22/9/2025 रोजी पहिल्या मानाच्या महाआरती प्रसंगी टिपलेले संग्रहित छायाचित्र)

धाईंजे लाकूड अड्डा,  आंबेडकरनगर अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य) येथील शिवभवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या श्री भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना सकाळी धार्मिक आणि पारंपारिक पद्धतीने विधियुक्त पूजेसह करण्यात आली. राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ नवी दिल्ली चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते पहिली मानाची पूजा आणि महाआरती घेण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सर्वेसर्वा शिवशक्ती भक्त सदाशिव ज्ञानोबा धाईंजे, आप्पा निवृत्ती मोरे महाराज, पत्रकार सुनील ज्ञानेश्वर कांबळे, सौ. सखुबाई सदाशिव धाईंजे, युवराज सदाशिव धाईंजे,ओम सुनील कांबळे, कार्तिक युवराज  धाईंजे, अविनाश खंडागळे, मयूर धाईंजे, यांच्यासह अनेक मान्यवर भाविक भक्त उपस्थित होते. आरती नंतर उपस्थित सर्वांना आरती प्रसाद वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या