विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/10/2026 :
विद्यार्थी दशेत नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आपल्याला सतत भरपूर प्रयत्न करावे लागतात. काही गोष्टी अगदी कमी प्रयत्नांत सहज साध्य होतात, तर काही गोष्टींवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अखंड सातत्याने खूप कष्ट घ्यावे लागतात.
याचाच अर्थ, एखाद्या वेळी एकदा-दोनदा प्रामाणिक प्रयत्न करूनही यश मिळाले नाही, तर हताश न होता प्रयत्नांची रणनीती आणि दिशा बदलावी लागते. त्यातून आपला अनुभव समृद्ध होतो; मिळालेल्या अनुभवातून नेमक्या चुका लक्षात येतात आणि त्या चुका दुरुस्त करत करतच आपण अखेर उत्तुंग यश संपादन करतो.
मुलांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सरावाने कराव्या लागतात; न थकता अखंड कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मनात कायम सकारात्मक दृष्टिकोन बाळगूनच वाटचाल करावी लागते.
"मला जमत नाही" म्हणून निराश होऊन एखादी गोष्ट अर्धवट सोडून देण्यापेक्षा, अभ्यासात सातत्य ठेवून चिकाटीने पाठपुरावा करा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या