⏹️ आरोग्यासाठी कढीपत्त्याचा चहा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/10/2026 :
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादी मध्ये कढीपत्ता वापरला जातो. मात्र कढीपत्त्याचा चहा हा आरोग्यासाठी निरोगी असतो. कढीपत्त्यात अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात, जे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून रक्षण करतात.
*पोषक घटक* : कढीपत्त्यात लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन-ए (कॅरोटीन), व्हिटॅमिन-सी इत्यादी अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. त्यामुळे कढीपत्त्याचा चहा पिणे फायदेशीर ठरू शकते.
*कढीपत्ता चहाचे फायदे*
◆ कढीपत्त्याचा उपयोग फक्त फोडणी देण्यासाठीच केला जात नाही, तर या औषधी वनस्पती पासून बनवलेला एक कप चहा देखील आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे देतो.
◆ कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया निरोगी राहते. त्यात सौम्य रेचक गुणधर्म आणि पाचक एंजाइम असतात, जे आतड्याची हालचाल सुधारतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते. तसेच बद्धकोष्ठता, गॅस, जुलाब आदी समस्याही कमी होतात.
◆ जर मधुमेह असेल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल, तर कढीपत्ता चहाचे सेवन करावे. हा चहा रक्तातील साखरेची पातळी वाढवत नाही, तर साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.
◆ कढीपत्त्यात उच्च पातळीचे फिनॉलिक्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे त्वचेच्या नुकसानापासून संरक्षण करतात. अँटिऑक्सिडंट मध्ये असलेले घटक शरीराला संसर्ग, जळजळ इत्यादी पासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी आहेत. आजारांपासून दूर राहायचे असेल तर एक कप कढीपत्त्याचा चहा नियमित घ्यावा.
◆ गरोदरपणातही या चहाचे सेवन करू शकता. हा चहा प्यायल्याने उलट्या, मळमळ, मॉर्निंग सिकनेस यासारख्या समस्यांचा त्रास होणार नाही. जर मोशन सिकनेस असेल, तर प्रवासापूर्वी आणि प्रवासा दरम्यान हा चहा प्यावा, उलट्या, मळमळ असा त्रास होणार नाही.
◆ कढीपत्त्याचा सुगंध किंवा वास मज्जातंतूंना आराम देण्यास मदत करतो. तणाव दूर करून मन आणि मेंदू शांत होतो. दिवसभर काम करून थकवा, तणाव जाणवत असेल, तर एक कप कढीपत्ता चहा प्यावा.
*कढीपत्ता चहा बनवण्याची कृती*
कढीपत्त्याचा चहा बनवण्यासाठी २०-२५ ताजी पाने स्वच्छ धुवून घ्या. चहाच्या भांड्यात एक कप पाणी घाला आणि गॅसवर ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर गॅस बंद करा. आता त्यात कढीपत्ता टाका. थोडा वेळ असेच झाकून ठेवा. गोडवा हवाच असल्यास थोडा गुळ वापरा, साखर नको. काही मिनिटातच पाण्याचा रंग बदलू लागेल. चहा एका कप मध्ये गाळून घ्या आणि गरमागरम पिण्याचा आनंद घ्या.
संकलन : अनिल साखरकर
गेट लाईफ लेझर पाइल्स हॉस्पिटल
लाली लॉन समोर, ओल्ड बायपास रोड
अमरावती
9158882450
≈===================
0 टिप्पण्या