⏹️ हाय कोलेस्ट्रॉल नि घरगुती उपाय
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/10/2026 :
खाण्या-पिण्यावर व्यवस्थित लक्ष न दिल्याने आणि खराब लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकात कोलेस्ट्रॉलची समस्या वाढत जात आहे. नसात कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होत नाही आणि त्यामुळे ऑक्सिजनचा व न्युट्रीशनचा सप्लाय होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. जर या समस्येकडे आधीपासून लक्ष दिलं तर व्यक्तीचा जीव वाचू शकतो.
*सकाळी रिकाम्या पोटी या पदार्थाचं सेवन करा* : जर शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण योग्य ठेवायचं असेल तर, रात्री १ चमचा मेथीच्या बिया, ४ बदाम, अर्धा वाटी ओट्स, १ चमचा जवसाच्या बिया, १ चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि २० मनुके भिजवून ठेवा. सकाळी उठल्यावर हे पदार्थ रिकाम्या पोटी खा. या पदार्थांच्या सेवनामुळे धमण्यात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल हळूहळू वितळू लागतं आणि ब्लड सप्लाय पूर्णपणे व्यवस्थित होतो.
*सूर्यफुलाच्या बिया आणि मनुके* : मनुक्यात व्हिटॅमिन, प्रोटीन, फाइबर, पोटॅशियम, कार्बोहाइड्रेट्स, कॅल्शियम सारखे तत्व असतात. जे शरीरातील ट्राइग्लिसराइडचं प्रमाण कमी करतं. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित राहतं. सूर्यफुलाच्या बियात अँटी-इन्फ्लामेट्री गुण असतात, ज्यामुळे शरीर फीट राहतं.
*मेथी, जवस आणि बदाम* : जवसाच्या बियात अँटी-ऑक्सिडेंट आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असतं. तेच मेथी मध्ये रायबोफ्लेविन, फोलिक ॲसिड, कॅल्शिअम, कॉपर आणि आयर्न जास्त असतं. ज्यामुळे नसात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. बदामामुळेही कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.
संकलन : डॉ. नरेंद्र वानखडे
MBBS, MS
गेट लाईफ लेझर पाइल्स हॉस्पिटल
लाली लॉन समोर, ओल्ड बायपास रोड,
अमरावती
9158882450
0 टिप्पण्या