■ पृथ्वीचा शेवटचा देश कोणता ? ■ जिथे ४० मिनिटेच सूर्यास्त होतो !

 

■  पृथ्वीचा शेवटचा देश कोणता ?

■  जिथे ४० मिनिटेच सूर्यास्त होतो !

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 13/10/2026 :

पृथ्वी गोल आहे, अशा गोलाकार पृथ्वीचा शेवटचा देश कोणता? त्या देशाचं वेगळेपणं काय? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक देश सुंदर असतो. जर हा देश पृथ्वीच्या शेवटचा देश असेल तर त्याचं सौंदर्य अधिकच खास असेल.

नॉर्वे हा जगातील सर्वात शेवटचा देश आहे. हा देश पृथ्वीचा शेवट आहे. हे देशातील उत्तर पोल मध्ये आहे. नॉर्थ पोलची अशी जागा आहे जेथे पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते. नॉर्वे हा देश सर्वात सुंदर आहे. येथे रात्र होत नाही. झालीच तरी ती फार छोटी असते. नॉर्थ नॉर्वेच्या हेवरफेस्ट सिटी मध्ये फक्त ४० मिनिटांसाठी सूर्यास्त होतो. यामुळे याला 'कंट्री ऑफ मिडनाइट सन' देखील म्हटलं जातं. नॉर्वे हा देश खूप थंड आहे. अनेक देशात उन्हाळ्यात ४५ ते ५० डिग्री तापमान असते. या देशात अक्षरशः बर्फ जमा होतो. यावेळी नॉर्वे मधील तापमान हे शून्य डिग्री असते. थंडीत हे तापमान उणे ४५ डिग्री असते. येथे पोहोचल्या नंतर एका वेगळ्याच जगाचा अनुभव येतो. उत्तर ध्रुव जवळ असल्यामुळे येथे इतर देशांप्रमाणे रात्र किंवा सकाळ होत नाही. येथे सहा महिने रात्र तर सहा महिने दिवस असतो. थंडीच्या दिवसात तर येथे सूर्य दिसणे कठीण होते. येथे कधी सूर्य मावळतच नाही. उन्हाळ्यात येथे रात्र होत नाही. ही जागा इतकी इंटरेस्टिंग आहे की, लोकं दूरून पाहायला येतात. 

हे सर्व जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच नॉर्वेला जावसं वाटेल. पण E-69 हायवे पृथ्वीच्या टोकाला नॉर्वेशी जोडतो. हा रस्ता अशा ठिकाणी संपतो जिथून पुढे जाता येत नाही, कारण जग इथेच संपते. या महामार्गावर जायचे असले तरी एकट्याने जाण्यास मनाई आहे. यासाठी एक ग्रुप तयार करावा लागतो आणि नंतर येथे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. या रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला एकट्याने जाण्यास किंवा एकट्याने वाहन चालविण्यास परवानगी नाही. येथे सर्वत्र बर्फ आहे, त्यामुळे एकट्याने प्रवास करताना हरवण्याची भीती आहे. या ठिकाणी सूर्यास्त आणि पोलार लाइट्स पाहणे मजेदार आहे. येथे मासळीचा व्यापार होत असे, पण हळूहळू या देशाचा विकास झाला आणि पर्यटक येथे येऊ लागले. आता पर्यटकांना येथे राहण्यासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : Zee News

===================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या