विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/10/2026 :

आपण अनेकदा कोणाला तरी काही मदत करतो; त्यांच्या अडचणीच्या वेळी आपण त्यांच्या उपयोगी पडतो. कुणाचे काही अडले-नडले असेल, तर ती वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न करतो आणि कधी कधी त्यांना योग्य मार्गदर्शनही करतो.

खरे तर, हे सर्व आपण अत्यंत निःस्वार्थ मनाने करणे अपेक्षित असते. 'मी मदत केली, त्यामुळे त्यांनी माझी परतफेड करावी' ही अपेक्षा तर कधी करायचीच नाही; पण आपण केलेल्या मदतीची सतत चर्चा करून ती सर्वांना सांगतही सुटायचे नाही.

मुलांनो, असे केल्याने आपलाच अहंकार वाढीस लागतो. आपण स्वतःला कुणीतरी मोठे आणि वेगळे समजू लागतो. 'आपण कोणासाठी तरी काहीतरी केले आहे' या विचाराने आपण स्वतःला गर्विष्ठ बनवतो आणि हाच गर्व आपल्या प्रगतीत मोठी अडचण निर्माण करतो.

'एका हाताने दिलेले दान, दुसऱ्या हातालासुद्धा कळू द्यायचे नसते' असे म्हणतात. आपण याच उदात्त विचाराचे नेहमी पालन करू.

 सौ. स्नेहलता स. जगताप. ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या