⏹️ आरोग्यदायी उपयुक्त आवळा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/10/2026 :
लिव्हरच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन बाहेर काढणे आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करणे अशी कामे केली जातात. त्याशिवाय लिव्हरच्या मदतीने फॅट कमी करणे आणि कार्बोहायड्रेट स्टोर केले जातात. जर या अवयवात जराही बिघाड झाला तर त्याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो. आवळा एक असं फळ आहे जे लिव्हर चांगलं ठेवण्यासाठी फार फायदेशीर आहे. आवळ्याचा उपयोग सामान्यपणे केस आणि त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. तसेच आवळ्याचं सेवन करून फॅटी लिव्हरची समस्या दूर करू शकता. आवळ्यात व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होऊन अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव होतो. ज्या लोकांचं पचनतंत्र कमजोर असतं त्यांच्यासाठी आवळा बेस्ट उपचार आहे. आवळा शरीरासाठी एखाद्या सुपरफूड सारखा आहे आहे. याने डायबिटीस, इनडायजेशन, डोळ्यांची समस्या आणि लिव्हरची कमजोरी यासोबत लढण्यास मदत मिळते, याने मेंदूही मजबूत होतो. सोबतच कॅन्सर सारख्या गंभीर आजारा पासूनही बचाव होतो. जे लोक याचं नियमितपणे सेवन करतात त्यांना हार्ट अटॅकचा धोकाही कमी राहतो. लिव्हरला होणाऱ्या फायद्या बाबत सांगायचं तर आवळ्याने लिव्हरला सुरक्षा मिळते, कारण याने विषारी पदार्थ बाहेर निघतात. या फळाद्वारे शरीरातील हायपरलिपिडिमीया आणि मेटाबॉलिज्म सिंड्रोमही कमी केला जातो. आवळा खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सर्वात कॉमन पद्धत म्हणजे आवळा थेट चावून चावून खावा. ज्या लोकांना फॅटी लिव्हरची समस्या आहे ते लोक काळ्या मिठासोबत याचं सेवन करू शकतात. त्याशिवाय सकाळी उठून आवळ्याचा चहाही घेऊ शकता, असं केल्याने काही दिवसातच फरक दिसू लागेल.
संकलन : अनिल साखरकर
गेट लाईफ लेझर पाइल्स हॉस्पिटल
लाली लॉन समोर, ओल्ड बायपास रोड
अमरावती
9158882450
0 टिप्पण्या