मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/10/2026 :

शारदीय नवरात्रीचा आज दुसरा दिवस, म्हणजेच दुसरी माळ! आम्हा महिलांची नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते, यानुसार साड्या आणि कपड्यांची आधीच जुळवाजुळव झाली आहे. आज बहुतांश भगिनी त्या त्या ठरलेल्या रंगानुसार कपडे परिधान करतात.

पूर्वी ही प्रथा नव्हती; अगदी अलीकडच्या काही वर्षांत हे नऊ रंगांचे सुंदर वेड आले. आता पुरुष मंडळीसुद्धा या रंगानुसार कुर्ते किंवा शर्ट घालण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व पाहताना खूप प्रसन्न वाटते. त्यानिमित्ताने 'रंग माझा वेगळा' असा दुरावा न ठेवता, 'तुझा-माझा रंग एकच आहे' ही सुंदर एकात्मतेची भावना मनात निर्माण होते.

अशा वेळी आपले कर्तव्य बजावणारी गणवेशधारी मंडळी मात्र या रंगानुसार कपडे घालू शकत नाहीत. परंतु त्यांच्या खाकी वा अधिकृत गणवेशाची शान या रंगीबेरंगी कपड्यांना कधीच येऊ शकत नाही! हे सर्व गणवेशधारी कर्तव्यनिष्ठेने नेहमीच आपल्या गणवेशाचा मान राखतात; तसाच आपणही त्या सर्वांचा मनापासून सन्मान केला पाहिजे.

आजचा संकल्प

आपले कपडे बाह्यतः कोणत्या रंगाचे आहेत यापेक्षा, त्या कपड्यांच्या आत असणाऱ्या माणसाचे 'अंतरंग' किती शुद्ध आहे हे अधिक महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवू आणि आपले अंतरंग नेहमी निर्मळ ठेवू.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या