विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/10/2026 :
शालेय जीवनात तुम्हा सर्वांनाच विविध आकर्षक वस्तूंचा छंद म्हणून संग्रह करण्याची खूप आवड असते. वेगवेगळ्या रंगांचे पेन, विविध आकारांचे खोडरबर, ऐतिहासिक पोस्टाची तिकिटे, निरनिराळ्या देशांची नाणी व झेंडे अशा अनेक दुर्मिळ वस्तूंचा तुम्ही मोठ्या कौतुकाने संग्रह करता.
त्या संग्रहासाठी तुम्ही मनापासून भरपूर वेळ देता, पैशांची बचत करून खर्च करता आणि बरीच धावपळ करता. अनेक जाणकारांना भेटून त्यांच्याकडून नवी माहिती व वस्तू गोळा करता; थोडक्यात, तो वैयक्तिक संग्रह वाढवण्यासाठी तुम्ही तन-मन-धन अर्पण करता.
मुलांनो, या भौतिक वस्तूंच्या छंदासोबतच आपण आपल्या अंतर्मनात श्रेष्ठ सद्गुणांचाही असाच अनमोल संग्रह करूया ना! नम्रता, विनयशीलता, संवेदनशीलता, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि स्त्रियांविषयी आदर अशा अनेक सद्गुणांचा ठेवा आपण स्वतःमध्ये साठवून ठेवू आणि दैनंदिन जीवनात तसे आचरण करू.
केवळ भौतिक वस्तूंचा नव्हे, तर उदात्त मानवी गुणांचा संग्रह करूया आणि समाजाचे वातावरण सुंदर करूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या