नाना जाण्याच्या निम्मिताने...

 

नाना जाण्याच्या निम्मिताने... 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/10/2026 :

नानाला पहाटे 2.30 वाजता अस्वस्थ वाटू लागले. त्याने मित्राला msg केला पण ही वेळ कोणाचीही गाढ झोपेची असते. मित्र चार वाजता आला पण वेळ हातातून गेली होती.

हार्ट अटॅक बहुतेक वेळा पहाटे एक ते पाच या दरम्यान येतात. हे प्रमाण 60ते 70% आहें.

साधारण वयाच्या 60 नंतर शक्यतो एकटे राहू नये. कारण बरोबर कोणी असेल तर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी अडचण येत नाही.

वयाच्या 50 नंतर सॉरब्रीटेट नेहमी बरोबर ठेवावी. खिशात, उशी जवळ, सकाळी फिरायला जाताना अगदी टॉयलेट बाथरूम मध्ये ही ठेवावी. शरीर तुम्हाला आधी सूचना देते.

हार्ट अटॅक येण्या आधी शरीर घामाने डबडबते. अगदी अंघोळ केल्या सारखे. हृदय,डावा हात, खांदा, जबडा, खांद्याची मागील बाजू यात तीव्र वेदना येतात.

अशावेळी सॉरब्रिटेट गोळी जिभे खाली ठेवावी. गिळू नये.

ही गोळी तुम्हाला एक ते दीड तासाचा वेळ देते. या अवधीत जवळच्या, कोणत्याही जिथे सोयी असतील त्या दवाखान्यात ऍडमिट व्हावे.

शेजारी पाजारी यांना उठवावे, त्यांना गाडी काढण्यासाठी सांगावे आणि हॉस्पिटल गाठावे.

कोणाला पहाटे कसा त्रास देऊ असल्या गोष्टी मनात आणू नयेत.    

डॉ. विजयसिंह देशमुख.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या