असाही पितृपक्ष... आई-बाबा तुम्हाला सविनय सादर....!!!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/10/2026 :
सध्या पितृपक्ष सुरू झाला आहे, आपण आपल्या पूर्वजांना या दिवसात जेवू घालतो, ते किती खातात माहीत नाही, परंतु आपल्या मनाचं समाधान होतं...!
गेलेल्या आपल्या माणसाला सन्मानाने खांदा देणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं, हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, कारण त्यांच्याच मुळे आपण आहोत
परंतु आजही आपली अशी माणसं अजून जिवंत आहेत, ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, जी उद्या जाण्याच्या वाटेवर आहेत, आणि एका घासासाठी रस्त्यावर लाचारी पत्करत आहेत....!
ज्यांनी आपल्याला पूर्वी चिऊ काऊ म्हणत घास भरवले होते....!
जाताना खांद्या देण्यापूर्वी, यांना एक प्रेमाचा हात देऊया का....???
ते गेल्यावर त्यांना सन्मानाने खांदा देऊच, परंतु आज जिवंत असताना, आई बाबा म्हणत एक घास त्यांना प्रेमानं भरवूया का....?
तुम्हीच आमचे पूर्वज आहात, तुमच्यामुळेच आम्ही आज आहोत, आम्ही तुमच्यापुढे नतमस्तक आहोत, याची जाणीव त्यांना जिवंतपणी आजच त्यांना देऊया का...?
मग जातील तेव्हा ते खरोखरी तृप्त मनाने जातील....!
आणि म्हणून उद्या तीन ऑक्टोबर पासून, अशा जित्या जागत्या आई-बाबांच्या तृप्ततेसाठी, त्यांच्या समाधानासाठी.... आम्ही पितृपक्ष सुरू करत आहोत....!
अशा अनेक आई-बाबांना मी रस्त्यावर रोज भेटतो, त्यांच्या मुखी हास्य असतं....
आणि दरवेळी माझ्या मनात सवाल उठतो....
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो....
क्या गम है जिसको छुपा रहे हो...?
आई बाबा तुमची मुलं,


0 टिप्पण्या