कृष्णानंद विद्यामंदिर, अकलूज येथे कायदा जनजागृती व बालहक्क मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/10/2026 :
शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित कृष्णानंद विद्यामंदिर (तंत्र विभागयुक्त), पाटीलवस्ती-अकलूज येथे विद्यार्थ्यांसाठी कायदा जनजागृती व बालहक्क मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कवठे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. अल्ताफ बादशहा आतार (दिवाणी व फौजदारी न्यायालय, माळशिरस) यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ॲड. आतार यांनी विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेतील 7 महत्त्वाचे बालहक्क कलम 14, 21A, 19, 21, 24, 15, तसेच POCSO कायदा 2012, बालविवाह प्रतिबंधक कायदा सायबर सुरक्षा आणि हेल्पलाइन क्रमांक 1098,100,1930 याबाबत सविस्तर माहिती दिली व "कायदा तुमचा बॉडीगार्ड आहे" हा संदेश दिला.
सूत्रसंचालन सौ. सुनीता माने, ठोंबरे यांनी केले तर आभार सौ. कनबूर यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षिका सौ. सोनवणे, सौ. देशमुख, सौ. सावंत , सौ. ठोंबरे , सौ. शेख, सौ. माने, कु. आतार, श्री. शिंदे, गुरव, पवार,बोडरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या