■ भारतीय कॅप्टन स्मित मच्छार
■ यांचे साहसी कर्तृत्व !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/10/2026 :
कॅप्टन स्मित मच्छार हे एक धाडसी भारतीय पायलट (वैमानिक) आहेत, ज्यांनी सप्टेंबर २०२६ च्या शेवटी फ्लायदुबई विमानात झालेल्या भीषण हल्ल्या दरम्यान कमालीचे शौर्य दाखवून १८० प्रवाशांचे प्राण वाचवले.
३० सप्टेंबर २०२६ रोजी फ्लायदुबईचे विमान (फ्लाइट FZ 1073) दुबईहून इस्रायल मधील तेल अवीव येथे जात होते. विमान सुमारे ३४,००० फूट उंचीवर होते. कॉकपिट मध्ये विमानाचा ओमानी सह-वैमानिक नमाज पडण्याच्या बहाण्याने आपल्या जागेवरून उठला. कॅप्टन स्मित यांनी त्याच्या धार्मिक भावनेचा आदर करत समोर पाहत विमान उडवणे सुरू ठेवले. पण काही मिनिटातच त्या सह-वैमानिकाने मागून कॅप्टन स्मित यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोर सह-वैमानिकाने विमानाची सिस्टीम बदलून ते वेगाने जमिनीच्या दिशेने वळवले, जेणेकरून ९/११ सारखा मोठा अपघात घडवता येईल. विमानाची उंची २९ सेकंदात ३० हजार फुटांवरून १४ हजार फुटांवर आली होती.
कॅप्टन स्मित गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ झालेले असूनही त्यांनी हार मानली नाही. कॉकपिटचा दरवाजा आतून लॉक होता आणि हल्लेखोर बाहेरून टाकला जाणारा इमर्जन्सी कोड ब्लॉक करत होता. अशा कठीण परिस्थितीत कॅप्टन स्मित यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली आणि कॉकपिटच्या दरवाजाचा नॉब फिरवून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच विमानातील इतर क्रू मेंबर्स आणि प्रवाशांनी आत धाव घेऊन हल्लेखोराला ताब्यात घेतले. यानंतर विमानाचे सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर सुरक्षितपणे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
कॅप्टन स्मित हे मूळचे मुंबईचे (टिळकनगर, घाटकोपर) रहिवासी आहेत. ते एक अत्यंत अनुभवी पायलट असून त्यांना १३ वर्षांपेक्षा जास्त काळ व्यावसायिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. फ्लायदुबई मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी भारतातील स्पाइसजेट एअरलाईन मध्ये १० वर्षांहून अधिक काळ सीनियर कमांडर म्हणून सेवा दिली आहे. कॅप्टन स्मित यांच्या या अतुलनीय धाडसाने जगभरातील दिग्गजांनी त्यांचे कौतुक केले. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी तर त्यांना इस्रायलच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित खास सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : इंटरनेट

0 टिप्पण्या