सजीव -निर्जीव
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/10/2026 :
नाही होत वाढ
नाही हालचाल
असतो अचल
तो निर्जीव,
लागे अन्नपाणी
घेतसे श्वास
असे हमखास
तो सजीव,
उडते विमान
धावे आगगाडी
चालणारी गाडी
ना सजीव,
हलते ना झाड
चालते ना खोड
परि होई वाढ
ते सजीव,
गाईस वासरू
माणसा लेकरू
आभाळी पाखरू
ना निर्जीव!
शुभांगी तरडे.
9689694805
सातारा.
----------------------------
चौथी किंवा सातवी पर्यंत असणाऱ्या सातारा जिल्हा परिषदच्या शाळेत खेड्यातील असणाऱ्या शिक्षिका शुभांगी तरडे या आहेत. त्या कविता करतात. त्यांच्या शाळेत मी व्याख्यानासाठी गेलो होतो. त्यांना मी मुलांसाठी विज्ञान विषयातील संकल्पना समजतील, स्पष्ट होतील अशा कविता कराव्यात अशी सूचना केली होती. तर वरील पहिलीच कविता त्यांनी केली आहे. ती आपल्या दैनिकात, साप्ताहिकात, मासिकात, नियतकालिकात छापावी व त्यांना प्रोत्साहित करून आपल्यासाठी एक कवि जोडून घ्यावे.
...काशीनाथ देवधर
0 टिप्पण्या