🌹 बिनधास्त आयुष्य मजेत जगणाऱा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/10/2026 :
एक सर्वसाधारण मुलगा अति हुशार, तल्लख बुद्धी, मेहनती असलेल्या करियर माइंडेड मुलांविषयी सगळे लिहितच असतात, वाटलं, का ना आपण एका सर्वसाधारण बिलो एव्हरेज हुशारी असलेल्या पण बिनधास्त आयुष्य मजेत जगणाऱ्या मुलाच्या हृदयात शिरून लिहावं.? ह्यात हुशार नसलेल्यांची थट्टा करण्याचा मुळीच हेतू नाही. हा त्यांच्या साध्या पण सुखी आयुष्याची एक पुसटशी झलक डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे.
परीक्षांचं टेन्शन ..? मला..? छे, कधीच नसायचं,
असलंच तर माझं टेन्शन मास्तरांना असायचं, कसं असायचं ना...
तिमाहीत बघायला गेलं तर तसा पोर्शनच नसायचा फार, एकदम सगळं ईझी, सहज निघून जायचो बाऊंड्री वर..!
गणित, हिस्टरी सारख्या दोन तीन विषयांच्या मार्क्स ना मास्तर लाल पेन नी गोल करायचे..!
पास झालो होतो ना..? बास, लाल पेन नी करा का हिरव्या पेन नी करा, मला काय फरक पडतो...!
पुढे बघता बघता सहामाही यायची दिवाळीच्या सुमारास, त्याचं ही कधीच टेन्शन घेतलं नाही, दिवाळी अन परीक्षा एकदम आल्या म्हणून टेन्शन घ्यायचे माझे मित्र..!
त्यात काय टेन्शन घ्यायचं..? काय झालं दिवाळी अन परीक्षा एकत्र आल्यात तर.? दोन्ही ठिकाणी दिवेच तर लावायचे असतात, एवढं काय त्यात.?
इतकंच काय मार्च आला तरी टेन्शन नसायचं मला, उलट गरम व्हायला सुरू व्हायचं तर मला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे वेध लागायचे, वाटायचं वा आयुष्य किती सुंदर आहे पण तेवढ्यात दुधात मिठाचा खडा पडावा तसं वार्षिक परीक्षेचं टाईम टेबल येऊन पडायचं, सुरु करायला हवा आता अभ्यास म्हणता म्हणता एप्रिल उजाडायचा, पहिल्यांदाच दडपण आल्यासारखं वाटायचं सात दिवसावर परीक्षा म्हंटल्यावर.!
सात तारखेलाच का सुरू व्हायची परीक्षा कोणास ठाऊक..!
पहिला पेपर मराठी....
'संदर्भासहित अर्थ लिहा' सोडलं तर बाकी सोप्प वाटायचं मराठी, सोप्प, डबल 'प' असं सोप्प मराठीचच काय ते वाटायचं ..!
सातच दिवस उरल्याच्या दडपणात पहिल्या पेपरचाच अभ्यास खूप करत बसायचो, बाकी पेपर मग माझ्या पध्दतीनेच हाताळायचो..! गणिताच्या पेपर नंतर मी इतरांसारखं बाकी मित्रांसोबत अँनसर्स चेक करत बसायचो नाही, एकदा केले होते, ज्या गणिताचं सगळ्यांचं उत्तर ०.००२५ आलं होतं त्याचं माझं १७४४ आलं होतं म्हणून मग मी हळूच त्यांच्यातून सटकलो होतो, मग पुढे तो नादच सोडला.!
परीक्षेनंतर बऱ्याच जणांना डिप्रेशन यायचं पेपर मनासारखे गेले नाहीत म्हणून, मला नाही कधी तसं काही व्हायचं, म्हणजे कळायचच नाही खराब जातात म्हणजे नेमकं काय होतं त्यांचं, मास्तर ही मलाच विचारायचे कसा गेला रे पेपर, मी मस्त म्हंटल्यावर म्हणायचे नेहमीसारखाच मस्त की ह्यावेळी खरच मस्त गेलाय.? त्यात काय एवढं वाटून घ्यायचं, झालं ते झालं, कित्येकांना मीच धीर द्यायचो, थँक्स म्हणायचे मला, माझं काम असंच, परफेक्ट..!
पुढे रिझल्ट असाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या छान मजेत चालल्या असतांना नेमका टपकायचा, तेव्हाही इतरांसारखा हायपर मी कधीच नसायचो, रिझल्ट आणि नंबर कितवा येतो ते मी नशिबावर सोडायचो, आपण पेपर द्यायचं काम केलंय न, बस, बाकी आपल्या हातात कुठे काय असतं..? वार्षिक चे पेपर मिळत नसत, ते मला फार आवडायचं, वर्गात समोर बोलावून, सगळ्यांसमोर मोठ्याने मार्क सांगत हातात पेपर देत अब्रूचे धिंडवडे उडवण्याची पद्धत मला मान्य नव्हती, जे काय मिळवले त्याचं साधं कौतुक करणं कसं काय जमायचं नाही शिक्षकांना..?
वार्षिकचा रिझल्ट बोर्ड वर लावायचे..! पहिल्या नंबर वाल्याचं नाव सर्वात वर , बाकी मग खाली खाली, किती धडपड अन रेटारेटी करायचे मित्र कोणाचा कितवा नंबर आला ते बघायला.! मला त्यात काडीचा इंटरेस्ट नसायचा, नंबरचं काय घेऊन बसायचं एवढं..? साध्या दोन चार मार्कांनी तर नंबर खालीवर होतात, आत्मविश्वास दुखावतो माणसाचा त्यानी, दुसरं काय..!
मी आपलं सावकाश गर्दी ओसरल्यावर जायचो, लिस्ट खालून वर बघत जायचो, तिसरा चवथा तर असायचो खालून त्यामुळे लगेच सापडायचा माझा नंबर..!
एकदा मला आठवतं, दुसरा नंबर आलेल्याला फक्त दोन मार्क कमी पडले होते पहिल्याहुन तर किती म्हणून रडावं त्यानी, मला म्हणूनच अशी एक अन दोन मार्कांची मार्जिन पटायचीच नाही..!
तीस च्या खाली नंबराची मी अति हुशार, तल्लख बुद्धी, मेहनती असलेल्या करियर माइंडेड मुलांविषयी सगळे लिहितच असतात, वाटलं, का ना आपण एका सर्वसाधारण बिलो एव्हरेज हुशारी असलेल्या पण बिनधास्त आयुष्य मजेत जगणाऱ्या मुलाच्या हृदयात शिरून लिहावं.? ह्यात हुशार नसलेल्यांची थट्टा करण्याचा मुळीच हेतू नाही, हा त्यांच्या साध्या पण सुखी आयुष्याची एक पुसटशी झलक डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. अपेक्षाच कधी करत नसे , त्यामुळे नाराज होण्याचं नाटक पण कधी करावं लागलं नाही..!
एक गोष्ट तेवढी मला नेहमी खटकायची, पास झाल्याचे पेढे मात्र कधीच कोणी मागितले नाहीत मला..!
मीच जाऊन देवापुढे ठेऊन यायचो, वाटायचं, तो देईलच सगळ्यांना..! "
©® लेखक ~ डॉ संजय जहागीरदार

0 टिप्पण्या