मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/10/2026 :
आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष हा अगदी अटळ आहे. जन्माला येताना बाळाला जसा जीवनसंघर्ष करावा लागतो, अगदी तसाच तो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अखेरपर्यंत निरंतर चालू राहतो.
संघर्ष नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे आणि त्याची तीव्रता किती आहे, यावरच आपला मानसिक ताण अवलंबून असतो. संघर्षातून वाट काढत आपण ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचलो, तर यशस्वी झाल्याचे मनस्वी समाधान मिळते; पण अपेक्षित यश आले नाही, तर आपण लगेच नाराज होतो.
अशा वेळी निराश होऊन खचून न जाता, अपार जिद्दीने पुढे चालत राहणे सर्वांत महत्त्वाचे असते. बऱ्याचदा संघर्षाच्या कठीण काळात आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत असा न्यूनगंड मनात न बाळगता, शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घेऊन परिस्थिती धैर्याने हाताळणे गरजेचे असते.
आजचा संकल्प
कठीण संघर्षाच्या काळात माणसे अनेकदा एकटी पडतात; मात्र यश संपादन केल्यावर सभोवती माणसांची गर्दी जमते. आपण कधी एकटे पडलो तरीही मनोधैर्य न गमावता, अखंड जिद्दीने व चिकाटीने पुढे जाऊ आणि स्वतःला कर्तृत्वाने सिद्ध करू!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या