आधुनिक श्रावण बाळ

 

आधुनिक श्रावण बाळ

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 3/10/2026 :

 मित्रानो काय लिहू या व्यक्ती बद्दल काही समजत नाही पण खरं सांगतो आज पर्यंत  असा व्यक्ती मी आयुष्यात  बघितला नाही .

तुम्हाला याचा पराक्रम सांगतो कृपया मन लाऊन पोस्ट वाचा .

 या तरुणाचे नाव आहे monu betaurabala  याचे राहते ठिकाण बिहार  पटणा जिल्हाच्या छोट्याश्या गावातून येतो तर विषय असा आहे की   5-6 वर्षांपूर्वी याची आई मासे खाताना  , त्या मास्याचा काटा घशात अडकला ,   त्यामुळे त्याच्या आई ला घशात  खूप जखम झाली होती . 

या तरुणाचे कुटुंब खूप गरीब घरातून आहे ,  नदीवर मासे पकडून वगैरे हे लोक पोट भरतात , त्याने एक व्हिडिओ मधे म्हणले होते मी हिंदू आदिवासी आहे . 

हे कुटुंब गरीब असल्यामुळे  त्याच्या आईचा इलाज योग्य ठिकाणी करता आला नाही , त्यामुळे त्याच्या आईचा गळा  मधेच खूप सुजायचा तर कधी बरा व्हायचा  ..

म्हणजे ती जखम इतकी वाढली होती की त्याच्या आईचा मृत्यू देखील जवळ आला होता .

तर त्याने एक दिवस गावापासून 50 km अंतरावर महादेव मंदिरात नवस केला होता की   देवा माझ्या आईला  पूर्ण दुरुस्त कर  मी  चार धाम यात्रा  आणि 12 ज्योतिर्लिंग   धावत करेल  ..

तर काही दिवसात   देवाच्या कृपेने  त्याची आई  खरोखर च  दुरुस्त झाली  , जसा की  जणू चमत्कार च झाला  ...

त्याची आई आधी सारखी बोलायला लागली , चालायला लागली .

तर देवाला केलेला नवस नुसार   monu 6 महिन्यापूर्वी  पळत  4 धाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग करायला निघाला  ...

त्याच्या सोबत  दोन मित्र  सुधा गाडी घेऊन निघाले  , त्यांनी सोबत एक शेगडी , थोडे फार पेट्रोल पाण्याला पैसे आणि  राशन सोबत घेतले आणि देवाच्या भरोसे निघाले .

निघाले तेव्हा  त्यांना 10 - 15 - 20 दिवस  थोडा त्रास झाला , कधी जंगलात कधी , कधी मंदिरात तर कधी पेट्रोल पंप वर मुक्काम करावा लागायचा  , 

त्याचे दोन मित्र  तो धावताना  शॉर्ट क्लिप मोबाईल मधे शुट करायचे    आणि रात्री 8 नंतर ज्या ठिकाणी मुक्काम करायचे तिकडे  त्याचे व्हिडिओ एडिट करून  वायरल करायचे    आणि रात्र भर मोबाईल चार्जिंग करून  दुसऱ्या दिवशी परत   सकाळी  5 वाजता हे तीन मित्र निघायचे .

केलेल्या नवस नुसार  monu एकटा पळायचा  आणि त्याचे दोन मित्र बाईक वर असायचे ...

 कधी  10 km ,  कधी 30 km , तर कधी 40 km ला ब्रेक घेऊन   थोडा आराम  नाश्ता  पाणी   अस करत ते तीन मित्र  सकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत  प्रवास करायचे ...

तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो  त्याचा दोन मित्रांनी व्हिडिओ वायरल केल्याचा इतका फायदा झाला की   हळू हळू   प्रत्येक राज्यातले  शहरातले , गावातले हिंदू त्यांना संपर्क करायला लागले .

मग  दुसऱ्या , तिसऱ्या महिन्यात   ओडिशा , जगन्नाथ ,  तामिळनाडू ,  रामेश्वरम  अशा प्रत्येक राज्यात त्याला हळू हळू लोक रस्त्यात अडवून  मदत करू लागले .

काहींनी   हॉटेल वर जेऊ घातले , काहींनी हॉटेल वर लॉज वर मुक्काम साठी थांबवले तर काहींनी  पैश्याची मदत केली .

म्हणजे  अस समजा स्वतः महाकाल. त्याची वेग वेगळ्या रुपात सेवा करत होते , काळजी करत होते .

तुम्ही मला सांगा  तुम्ही  2 किलोमीटर तरी नीट धावा करू शकता का ?? 

मी स्वतः 200 मीटर धावलो तर मला धापा लागतील  , 10 किलोमीटर धावलो तर हॉस्पिटल मध्ये अडवा पडेल .

तो monu  न थकता  हजारो किलोमीटर धावत सुटला आहे .

मी म्हणतो कुठून त्याच्यात इतकी ताकद , शक्ती आली आहे  .

एका आई साठी   नवस पूर्ण करत सुटला आहे .

मी  आई साठी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती बघितले होते पण  त्या नंतर आई साठी   4 धाम यात्रा  पूर्ण करणारा  व्यक्ती  पहिल्यांदा बघितला ते पण धावत ?? 

तुम्हाला सांगतो मित्रान बऱ्याच लोकांना वाटले तो प्रसिद्धीसाठी  करतो आहे ,

तो फक्त शूट करे पर्यंत पळत असेल  नंतर  मित्राच्या गाडीवर बसत असेल .

तर   तुम्हाला सांगतो त्याची परीक्षा घेण्यासाठी  लोक काय करायचे  त्याला न कळू देता  40 - 50 किलोमीटर बाईक वर  त्याचा पाठलाग करायचे  , 

मी स्वतः एक तरुणाची reel बघितली तो म्हनला मी 40 किलोमीटर  याच्या मागे होतो  , पण तो शेवट पर्यंत मित्रांच्या bike वर नाही बसला ..

मित्रानो मला सांगा ज्या देवाने त्याच्या आई ला दुरुस्त केले त्या देवाला हा विश्वासघात कसा करेल ?? 

त्याने विश्वासघात केला तर देव  त्याला दुसरी संधी कशी देणार ?? 

तुम्हाला सांगतो मित्रानो  बिहार ,  ओडिशा , तामिळनाडू , कर्नाटक नंतर   हा monu शेवटी पोहोचला महाराष्ट्रात ...

मित्रानो महाराष्ट्रात   पोहचे पर्यंत तो इतका प्रसिद्ध झाला होता की  , 

तो महाराष्ट बॉर्डर वर जेव्हा पोहोचला  तेव्हा त्याला   एक गावातील लोकांनी असे  जंगी  स्वागत केले की  त्याचे शब्दात वर्णन करता येणार नाही .

मी  फोटो  add केल्या प्रमाणे   सातारा जिल्ह्यात  त्याच्या स्वागतासाठी ढोल पथक   ची व्यवस्था केली होती  ,   

तो दुसऱ्या गावामध्ये जाई पर्यंत  त्याच्या साठी पुरण पोळी  भोजन व्यवस्था करण्यात आली होती .

 सातारा , कोल्हापूर जाताना काही काही गावात  तर शाळेतल्या  विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले  ,  

काही गावात त्याच्यासाठी  फटाके वाजून , हार फुल , शौल पांघरूण त्याचे स्वागत झाले .

 काहींनी  दुकान वरून चिप्स दिले तर काही ठिकाणी  पाण्याची बिश्लारी ,

 पुण्याला जाताना  काही गावात मुलीनी लेझिम खेळून दाखवली  ,

भीमाशंकर वरून  नाशिक जाताना   बऱ्याच पोलिसांनी सुधा त्याचे स्वागत केले त्याला खर्चाला पैसे दिले .

काही ठिकाणी  त्याचे पाय धून  स्वागत झाले तर काही ठिकाणी घोड्यावर मिरवणूक करून स्वागत झाले .

प्रत्येक पावलावर त्याच्या मदतीसाठी आपले मराठी हिंदू धाऊन येत होते .

शिर्डी जाताना तर  डॉक्टर ने   त्याचे पाय दाबले ,  त्याच्या जखमा बऱ्या केल्या  , ते म्हणले की  तुम्ही भारताचे श्रावण बाळ आहात तुमच्या सारखा तरुण पुन्हा घडणे नाही .

शिर्डी वरून  संभाजी नगर निघाल्यावर  काही गावात त्याच्यासाठी  दाळ भट्टी चा पाऊण चार झाला ..

तो monu एक व्हिडिओ मधे म्हनला की मी इतके राज्य फिरून आलो पण  महाराष्ट्रात ज्या प्रकारे स्वागत झाले ते   आज पर्यंत बघितले नाही .

तुम्हाला सांगतो मित्रानो  प्रत्येक शहरात  त्याला तिकडचे हिंदू नवीन बूट गिफ्ट करायचे ,  मुक्काम केल्यावर   पाऊण चार करायचे .

मित्रानो आपल्या सनातन धर्मात  अतिथी देव भव  म्हणल्या जाते  त्याची प्रचिती monu भाऊ ला महाराष्ट्रात झाली .

चार धाम यात्रा , 12 ज्योतिर्लिंग करून आलेल्या व्यक्तीच्या आपल्या धर्मात  दर्शन घेतले जातात कारण तो व्यक्ती  महाकाल च्या पवित्र भूमीला स्पर्श करून आलेला असतो .

आपल्या धर्मात चार धाम यात्रा ला किती महत्व आहे हे  monu भाऊ च्या स्वागतावरून तुम्हाला समजले असेल ...

मित्रानो तो आज त्यम्बकेश्वर , घृष्णेश्वर वेरूळ करून  संभाजीनगर आला होता , इथून पुढे तो  परळी वैजनाथ करणार आहे ,

तिकडचे हिंदू  सुधा त्याचे जंगी स्वागत करतील अशी अपेक्षा करूयात .

त्याला भेटण्याचे  चरण स्पर्श करण्याचे सौभाग्य माझ्या नशिबी न्हवते याचे वाईट वाटते .

पण  ही पोस्ट  त्याच्या साठी समर्पित आहे .

परळी नंतर तो गुजरात , मध्यप्रदेश , up करून बिहार जाणार आहे .

तो  monu भाऊ प्रत्येक व्हिडिओ मधे एक च म्हणतो  की मी माझ्या आई साठी , सनातन धर्मासाठी   आणि या राष्ट्रासाठी निघालो आहे .

माझी पोस्ट खोटी वाटली तर लिंक मधे  त्याची id देतो सगळे व्हिडिओ बघून या 

खरच मला प्रश्न पडला  15 हजार km  पळण्याची शक्ती त्याच्यात आली कुठून ?? 

आजच्या युवांना खरच त्याच्या कडून खूप काही शिकण्या सारखे आहे इतकेच म्हणेल त्याच्या सारखी ताकद प्रत्येक  हिंदू तरुणांमध्ये यावी हीच देवाला प्रार्थना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या