विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 11/10/2026 :

आज अश्विन शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच अश्विन महिन्याचा पहिला दिवस! आज घराघरांत व मंदिरांत आदिशक्तीची विधिवत घटस्थापना होते. आजपासून नवमीपर्यंत अखंड नंदादीप तेवत ठेवून रोज झेंडूच्या पिवळ्या फुलांची वा पानांची माळ घटाला घातली जाते; आणि दहाव्या दिवशी आपण विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करतो.

घटस्थापना करताना घटाभोवती पात्रात सप्तधान्याची पेरणी केली जाते. त्यासाठी आपल्या शेतातील सुपीक माती वापरली जाते. नऊ दिवसांत ते धान्य किती जोमाने उगवते, यावरून मातीचा कस आणि धान्याच्या उगवणक्षमतेचे वैज्ञानिक निरीक्षण केले जाते.

मुलांनो, आपले भारतीय सण, रीती आणि परंपरा यांमागे आध्यात्मिक व पौराणिक महत्त्व तर आहेच; पण त्यासोबत एक सुंदर निसर्गपूरक वैज्ञानिक दृष्टीही दडलेली आहे. आपण नऊ दिवस दुर्गेचा उत्सव करतो, देवीचे मनोभावे पूजन करतो; यातूनच समाजात स्त्रीशक्तीचा व माता-भगिनींचा नितांत आदर करण्याची शिकवण मिळते.

नवरात्रोत्सवामागील वैज्ञानिक व सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्या आणि मनोभावे देवीचे पूजन करा!

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या