वयाच्या विशीतच स्वतःला लावून घ्या ‘या’ ६ सवयी; म्हातारपणात होणार नाही त्रास; डॉक्टरांनी दिला सल्ला…
6 golden habits for healthy aging : वयाच्या विशीत प्रत्येकाने फॉलो करायला सुरुवात केली पाहिजेत अशा सहा सवयी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/10/2026 :
*how to stay healthier into old age :* चांगले आणि आरोग्यसंपन्न वृद्धत्व अनुभवण्यासाठी लहान वयातच काही सवयी अंगी बाणवल्या, तर त्याचा पुढील आयुष्यात फायदा होऊ शकतो. हार्वर्ड, स्टॅनफर्ड व एम्स येथे प्रशिक्षण घेतलेले बोर्ड-प्रमाणित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ज्ञ) डॉक्टर सौरभ सेठी यांनी आरोग्यसंपन्न वृद्धत्वासाठी सहा महत्त्वाचे सल्ले सांगितले आहेत, जे वयाच्या विशीत प्रत्येकाने फॉलो करायला सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या सल्ल्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, प्रथिने, फायबर, नाश्ता, कॉफी व चिया सीड्स यांचा समावेश आहे.
*लहान वयातच अंगीकाराव्यात अशा ६ सवयी*
*१. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वजन उचलणे*
वाढत्या वयानुसार चयापचय, हाडे, संतुलन आणि स्वावलंबन टिकवून ठेवण्यात स्नायूंची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे स्क्वॅट्स, हिंजेस व कॅरीजवर लक्ष केंद्रित करावे आणि हळूहळू प्रतिकारशक्ती वाढवावी. त्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा वजन उचलण्याची सवय करावी.
*२. जेवणात पुरेशी प्रथिने*
फक्त रात्रीच्या जेवणात प्रथिनांचा समावेश करण्याऐवजी तुमच्या प्रत्येक जेवणात २५ ते ३५ ग्रॅम प्रथिनांचे सेवन केले जाईलच याची काळजी घ्या आणि त्यासाठी अंडी, ग्रीन योगर्ट, मसूर, टोफू, मासे, चिकन किंवा काॅटेज चीज अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.
*३. दररोज ३० ग्रॅम फायबरचे सेवन*
फायबर हे मायक्रोबायोस, कोलेस्ट्राॅल, रक्तातील साखर, आतड्यांची नियमितता आणि मोठ्या आतड्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे जी मंडळी आहारात फायबरचे सेवन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी दर आठवड्याला सुमारे पाच ग्रॅम फायबर वाढवावे आणि आतड्यांना सवय होईपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
*४. नाश्ता प्रथिने आणि फायबरयुक्त असावा*
तुमचा नाश्ता प्रथिने आणि फायबर या दोन्हींवर आधारित असावा. तुम्ही ज्यूस किंवा पेस्ट्री खाल्ल्याने तासांतच पुन्हा भूक लागू शकते. त्यामुळे नाश्त्यामध्ये अंदाजे २५ ते ३५ ग्रॅम प्रथिने आणि १० ग्रॅम फायबर खा. त्यासाठी नाश्त्याच्या पदार्थांमध्ये बेरी आणि चिया सीड्स बरोबर ग्रीक योगर्ट, भाज्या आणि होल-ग्रेन टोस्टबरोबर अंडी, किंवा बिया आणि सुकामेव्याबरोबर ओट्सचासुध्दा समावेश करा.
*५. काॅफी प्या*
मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या निरीक्षणात्मक अभ्यासांनुसार, माफक प्रमाणात काॅफी प्यायल्याने एकूण मृत्यूचा धोका कमी होण्यासोबतच यकृताचे जुनाट आजार आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. दिवसातून दोन ते तीन कप कॉफी आरोग्यदायी दिनचर्येचा भाग असू शकते. मात्र, काॅफी शक्यतो साधी आणि कमी साखरेची घ्यावी. तसेच रात्रीच्या झोपेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत काॅफी पिण्याची वेळ ठरवावी.
*६. चिया सीड्स*
दररोज एक ते दोन चमचे घिया सीड्सचे सेवन करावे. दोन मोठे चमचे चिया सीड्समधून सुमारे १० ग्रॅम फायबर आणि वनस्पतीजन्य ओमेगा-३ फॅट्स मिळतात. चिया सीड्स भिजवून किंवा दही किंवा ओटमिलमध्ये मिक्स करून, तुम्ही त्याचे प्रमाण हळूहळू वाढवू शकता आणि पाणीही पुरेशा प्रमाणात सेवन करा. तर एकुणच पाहिल्यास, डॉक्टरांचे हे सहा सल्ले तुमच्या दैनंदिन सवयींवर लक्ष केंद्रित करतात, ज्या हळूहळू अंगी बानवता येतात. त्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि संतुलित आहारापासून ते फायबर, काॅफी आणि चिया सीड्सपर्यंतच्या सवयींचा समावेश आहे.
संकलन : यशवंत वाघ
************************

0 टिप्पण्या