रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘India into the Space ’ या विषयावर प्रेरणादायी सत्र

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘India into the Space ’ या विषयावर प्रेरणादायी सत्र 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/9/2026 : रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल, मांडवे येथे आज  India into the Space – भारताची अंतराळ क्षेत्रातील वाटचाल’ या विषयावर प्रेरणादायी व मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  अंतराळ शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ व लेखक प्रो.(डॉ.) राजमल जैन कोठारी , FRAS हे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून उपस्थित होते.

प्रो. (डॉ.) राजमल जैन कोठारी हे PRL/ISRO व भारत सरकारच्या अंतराळ संशोधनाशी संबंधित कार्य करणारे शास्त्रज्ञ असून, त्यांनी सौर भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले आहे. ते उदयपूर सोलर ऑब्झर्व्हेटरी (USO) चे सह-संस्थापक आहेत. त्यांच्या वैज्ञानिक कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे SOXS (Solar X-ray Spectrometer) अर्थात सूर्ययान-१ या अंतराळ मोहिमेचे प्रकल्प संचालक म्हणून केलेले कार्य. हे उपकरण २००३ मध्ये GSAT-2 उपग्रहावर पाठविण्यात आले होते आणि त्याद्वारे सूर्यावरील सौर ज्वाला व क्ष-किरणांचा अभ्यास करण्यात आला.

प्रो. कोठारी यांनी सौर भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात १२० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित केले असून, त्यांनी जगभरातील जवळपास १०० देशांना भेटी देऊन ५०० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. ते KSV विद्यापीठ, गांधीनगर येथे प्राध्यापक म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.

कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना भारताचा अंतराळ संशोधनातील प्रवास, विज्ञान व नवोपक्रमाची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका आणि अंतराळ व तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुणांसाठी उपलब्ध संधी याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रश्न विचारले आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची जिज्ञासा, नवकल्पनांची आवड आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीची तसेच भविष्यातील संधींची माहिती मिळाली.

कार्यक्रमाचा संदेश — “ Dream, Explore, Achieve” आणि “Together Towards a BrighterFuture ” — विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.

त्यांनी विद्यार्थ्यांना ४ मुख्य गोष्टींवर मार्गदर्शन केले:

१. भारताचा अंतराळ प्रवास आणि यश (India's Space Journey & Achievements):- ISRO ने सायकलवर रॉकेटचे पार्ट्स नेण्यापासून ते चांद्रयान-३ आणि आदित्य-L1 पर्यंत कसा प्रवास केला. त्यांनी स्वतः बनवलेली सूर्ययान-१ (SOXS) मोहीम २००३ मध्ये कशी पाठवली, याचा अनुभव सांगितला.

- फेल्युअर म्हणजे अपयश नाही, तर शिकण्याची संधी आहे - हे ISRO च्या उदाहरणातून सांगितले.

२. विज्ञान आणि इनोव्हेशनचे देश घडवण्यात महत्त्व:- फक्त डॉक्टर-इंजिनियरच नाही, तर शास्त्रज्ञ होणेही देशसेवाच आहे. उदयपूर सोलर ऑब्झर्व्हेटरी सारखी वेधशाळा पाण्याच्या मधोमध का बांधली - यातून विज्ञानात Observation किती महत्त्वाचे आहे हे सांगितले.

३. तरुणांसाठी संधी (Opportunities for Young Minds):- ISRO, PRL, NASA मध्ये जायचे असेल तर आतापासून काय करावे - गणित आणि भौतिकशास्त्र पक्के करा. Explore, Learn, Innovate, Achieve हा मंत्र दिला.त्यांनी सांगितले - "जवळपास १०० देश फिरलो, पण खरी मजा प्रश्न विचारण्यात आहे." म्हणून जिज्ञासा ठेवा.

४. Interactive Session:- शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली - जसे की अंतराळात कसे जायचे, सोलर एनर्जीचे भविष्य काय. क्ष-किरणांचा अभ्यास करण्यात आला. या सत्रात प्रो. कोठारी यांनी विद्यार्थ्यांना भारताचा अंतराळ प्रवास व यश, विज्ञान व नवोपक्रमाचे महत्त्व, तरुणांसाठी उपलब्ध संधी आणि जिज्ञासू वृत्तीचे महत्त्व या चार प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले.

विज्ञान आणि नवोपक्रम हे राष्ट्रनिर्मितीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यापुरते मर्यादित न राहता शास्त्रज्ञ, संशोधक आणि नवोन्मेषक होण्याचे आवाहन केले. उदयपूर सोलर ऑब्झर्व्हेटरी पाण्याच्या मधोमध का उभारण्यात आली, याचे उदाहरण देत त्यांनी वैज्ञानिक संशोधनात Observation अर्थात निरीक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

तरुणांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी ISRO, PRL आणि NASA सारख्या संस्थांमध्ये संशोधनाच्या संधी मिळविण्यासाठी गणित व भौतिकशास्त्राचा पाया मजबूत करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना “Explore, Learn, Innovate, Achieve” हा मंत्र देत त्यांनी जिज्ञासा कायम ठेवण्याचे आवाहन केले. जगभरातील जवळपास १०० देशांना भेट दिल्याचा अनुभव सांगताना त्यांनी, “खरी मजा प्रश्न विचारण्यात आहे,” असे सांगून विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित केले.

प्रो.कोठारी यांनी सौर ऊर्जा, अंतराळ संशोधन आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या संधींबाबतही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सत्राच्या शेवटी झालेल्या इंटरॅक्टिव्ह प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अंतराळात कसे जाता येते, सोलर एनर्जीचे भविष्य काय आहे, तसेच अंतराळ संशोधनातील करिअरच्या संधी यांसारखे विविध प्रश्न विचारले. प्रो. कोठारी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्स्फूर्तपणे उत्तरे देत त्यांच्याशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची जिज्ञासा, नवकल्पनांची आवड आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचा “ Dream, Explore, Achieve” आणि “Together Towards a Brighter Future ” हा संदेश विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी,संस्थेचे मार्गदर्शक वीरकुमार अनंतलाल दोशी, संस्थेचे चेअरमन प्रमोद अनंतलाल दोशी, सहसचीव अभिजीत दोशी, मुख्याध्यापिका सौ.देसाई, संस्था समिती सदस्य अजय गांधी, चंद्रकांत तोरणे, रामदास गोफणे, सुरेश धाईजे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मोहिते  आणि प्रास्ताविक सौ.देसाई  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या