मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/9/2026
दैनंदिन जीवनात आपले राहणीमान कसे आहे, त्यावरूनच अनेकदा लोक आपली किंमत ठरवत असतात. आपले कपडे, दागिने, मोबाईल, पर्स, अगदी शूज किंवा चप्पलसुद्धा साधी आहे की ब्रँडेड, यावरून लोक आपल्या आर्थिक परिस्थितीचा सहज अंदाज बांधतात.
श्रीमंत व्यक्तींना समाजात नेहमीच मोठेपणा मिळतो, मान दिला जातो, आदर-सत्कार होतो आणि इतरांपेक्षा वेगळी वागणूकही मिळते. त्यात जर जोडीला स्वभाव दिलदार, मनमोकळा आणि सहकार्य करणारा असेल, तर मग दुधात साखरच!
पण पैशाच्या बाह्य श्रीमंतीपेक्षा मनाची अंतस्थ श्रीमंती कितीतरी पटींनी श्रेष्ठ असते. भुकेल्या व्यक्तीला अन्न-पाणी द्यावेसे वाटणे, तिच्यातील माणुसकीची काळजी वाटणे, न सांगताही तिची खरी अडचण ओळखणे आणि ती सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे... असा संवेदनशील माणूसच खरा श्रीमंत असतो!
आजचा संकल्प
समोरच्या व्यक्तीला सन्मानाने 'माणूस' समजण्यासाठी प्रथम आपल्या मनातील माणुसकी जागी ठेवू आणि माणसाशी माणसासारखेच प्रेमाने वागण्याचे सद्बुद्धीचे मागणे गणरायाकडे मागूया.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या