मनाची शुद्धता


मनाची शुद्धता

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 
वृत्त एकसत्ता न्यूज 
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 
अकलूज दिनांक 23/9/2026 :
आपली मुले मोठी होत असताना केवळ त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा पुरवून आपले कर्तव्य संपत नाही; त्यासोबतच त्यांना उत्तम शिक्षण आणि सुसंस्कार देणेही तितकेच आवश्यक असते.
घरात वडीलधाऱ्यांशी आदराने कसे वागावे, घराबाहेर पडल्यावर सामाजिक शिस्त कशी पाळावी, निखळ मैत्री कशी जपावी आणि शिक्षक व ज्येष्ठांचा मान कसा राखावा, हे सर्व त्यांना आपल्या प्रत्यक्ष वागण्या-बोलण्यातून समजेल याची आपण दक्षता घेतली पाहिजे.
मुले बहुतांश वेळा पालकांचेच बारीक निरीक्षण व अनुकरण करतात; नकळत ते आपले गुण-दुर्गुण आत्मसात करतात. यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आपल्यातील व्यसने, घरातील कलह किंवा बाहेरील वादविवाद यांचे पाल्याच्या कोवळ्या मनावर निश्चितच गंभीर दुष्परिणाम होतात.
आजचा संकल्प
आपल्या मुलांचे वागणे-बोलणे सुसंस्कृत व्हावे म्हणून आपण स्वतः त्यांच्यावर उत्तम संस्कार करू; एक जबाबदार आई-वडील म्हणून ते समाजात आपल्याला आदराने ओळखतील याची सदैव दक्षता घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या