विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/9/2026
आता सार्वजनिक गणेश मंडळांची सजावट पूर्ण झाली असेल! सर्वत्र छान-छान देखावे सादर केले जात असतील. काही ठिकाणी समाजप्रबोधनपर जिवंत देखावे, तर कुठे मनमोहक विद्युत रोषणाई असेल. हे सर्व पाहायला आई-बाबांबरोबर जाताना तुम्हाला घरातून भरपूर सूचना मिळत असतील, होय ना?
"गर्दीत आई-बाबांचा हात सोडायचा नाही; एकट्याने पुढे जायचे नाही; गर्दीत चुकून ताटातूट झालीच तर घाबरून न जाता थेट पोलीस काकांकडे जायचे, स्वतःचे नाव आणि आई-बाबांचा फोन नंबर सांगायचा; कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत जायचे नाही," वगैरे वगैरे!
मुलांनो, कोणताही मोठा सार्वजनिक सण किंवा उत्सव असतो, तेव्हा प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात असतो. त्यांनी सुरक्षेसाठी केलेले नियम आपण शिस्तीने पाळायचे आणि त्यांना मनापासून सहकार्य करायचे.
सणासुदीच्या आनंदात आपले आई-बाबा घरी सुट्टीवर असतात; मात्र आपले कर्तव्यदक्ष पोलीस बांधव व सैनिक अहोरात्र रस्त्यावर ड्युटी बजावत असतात. त्यांच्या या उदात्त कर्तव्यभावनेला मानाचा सलाम!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या