रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/9/2026 : रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व जुनिअर कॉलेज मांडवे, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री व सौ सुचिता अशोक कुमार दोशी अकलूज, व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्री व सौ सुनेत्रा सतीश दोशी अकलूज यांच्या हस्ते शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावळी श्री व सौ डॉक्टर वैशाली समीर दोशी (एमबीबीएस मेडिसिन) अकलूज, व श्री व सौ डॉक्टर सोनाली स्वप्निल दोशी स्त्री रोग तज्ञ अकलूज उपस्थित होते.
स्वप्निल दोशी यास नामांकित AIIMS हैदराबाद येथे प्रवेश मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार रत्नत्रय परिवाराच्या वतीने करण्यात आला. विविध मूल्य शिक्षणाचे अर्थ असलेले विविध बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संचालकांना संस्थेला शुभेच्छा देणारे सुंदर ग्रीटिंग भेट दिले.
पालक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास गोपणे व पालक संचालक यांचाही सन्मान झाला.
डॉक्टर सतीश दोशी यांनी सांगितले की मुलांनी मोबाईलचा वापर गरजेनुसार करावा अनंतलाल दादांनी लावलेले हे छोटेसे रोपटे आता चांगले बहरत आहे आणि या संस्थेसाठी माझं कायम सहकार्य लाभेल. प्रमोद दोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ही शिक्षण संस्था एक उत्पन्नाचे साधन नसून ज्ञानदानाचा वसा आहे हा वसा अविरत चालू ठेवण्यासाठी आपले मदतीचे हात पुढे यावे ही अपेक्षा. संस्थेचे सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने ही संस्था यशाची नवीन शिखरे पार करेल अशी मला खात्री आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी 18 वर्षाचा संस्थेचा खडतर प्रवास आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला. संस्थेचा अठरावा वाढदिवस म्हणजे जणू काही पोटच्या लेकराचा अठरावा वाढदिवस असल्याप्रमाणे त्यांच्या भावना मनोगतातून व्यक्त झाल्या. संस्थेचे संचालक रामदास कर्णे यांनी संस्थेचा अठरा वर्षाचा खडतर प्रवास मी जवळून पाहिला आहे. खरंच संयम, जिद्द, आणि चिकाटी याचेही शिक्षण या संस्थेत दिले जाते याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रत्नत्रय होय.
यावेळी ज्ञानेश राऊत ,गजेश जगताप, रणदिवे , निंबाळकर, यांनी आपल्या मनोगत आतून संस्थेला शुभेच्छा दिल्या.तसेच याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, सौ.मृणालीनी दोशी,
मार्गदर्शक विरकुमार दोशी, सचिव प्रमोद दोशी, संचालक अभिजीत दोभाडा, सौ. पुनम दोशी, वैभव शहा, सुरेश धईंजे, रामदास कर्णे,सनत कुमार दोशी, चंद्रकांत तोरणे, रामभाऊ गोफने, सुरेश खरात , रवींद्र वाघमोडे, अर्चना गटकुळ,अरूणा शहा, दहिगाव, नातेपुते, मांडवे, माळशिरस या संस्थांचे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सविता देसाई तर सूत्रसंचालन अमृता मोहिते यांनी केले.



0 टिप्पण्या