🩺हेल्थ मंत्रा |आरोग्य मंत्र|🩺
गाडीत बसलं की सटासट उलट्या, मळमळतं-डोकं जाम? बॅगेत ठेवा ३ गाेष्टी- मळमळ बंद आणि प्रवास होईल
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/9/2026 :
फिरायला जाणे, नवनवीन ठिकाणांना भेटी देणे हा प्रत्येकालाच आवडते. पण अनेकांसाठी कार, बस किंवा विमानाचा प्रवास अत्यंत वेदनादायी ठरतो. गाडी सुरु होताच डोके दुखणे, मळमळ होणे, चक्कर येणे किंवा सरळ उलट्या होणे असा त्रास सुरु होतो. या त्रासाला मोशन सिकनेस असं म्हणतात.
मोशन सिकनेस होण्यामागे एक साधे गणित आहे. जेव्हा आपले डोळे शरीर स्थिर असल्याचे पाहतात, परंतु कानाच्या आतील भाग (Inner Ear) गाडीच्या वेगाची हालचाल टिपतो, तेव्हा मेंदूला परस्परविरोधी (Mixed Signals) संदेश मिळतात.(travel sickness remedies for car journeys) यामुळे मेंदूचा गोंधळ उडतो आणि मळमळ व उलट्या सुरू होतात.अनेकदा या त्रासामुळे लोक प्रवासाला जायलाच घाबरतात किंवा प्रवासाचा आनंद पूर्णपणे वाया जातो. पण यावर कोणत्याही गोळ्या- औषधांशिवाय आपण फक्त ३ गोष्टी सोबत ठेवल्या तर मोशन सिकनेस पळवून लावू शकतो.
1. आल्याची कँडी किंवा आले-गुळाचा तुकडा. आल्यामध्ये जिंजरोल नावाचे नैसर्गिक घटक असतात, जे पोटातील स्नायूंना शांत करतात आणि मळमळ रोखतात. प्रवासादरम्यान मळमळ किंवा अस्वस्थता जाणवू लागताच बॅगेतील आल्याची कँडी, आल्याची गोळी किंवा आल्याचा लहान तुकडा तोंडात ठेवून हळूहळू चोखावा. यामुळे मळमळ ५ मिनिटांत थांबते.
2. लिंबाचा आंबट- गोड स्वाद आणि सुगंध मळमळ थांबवण्यासाठी सगळ्यात प्रभावी मानला जातो. प्रवासाला निघताना एका लहान डब्यात लिंबाची कापलेली फोड आणि काळे मीठ सोबत ठेवा. गाडीत उलटीसारखे वाटू लागल्यास लिंबावर काळे मीठ भुरभूरवून ते चाटावे. यामुळे पोटातील आम्लता कमी होऊन लगेच ताजेतवाने वाटते.
3. पुदिन्याचा सुगंध मज्जासंस्थेला शांत करतो आणि मेंदूला फ्रेश मेसेज पाठवतो. बॅगेत पेपरमिंट इसेंशियल ऑइलची छोटी बाटली ठेवा. मळमळ झाल्यास रुमालावर या तेलाचे २ थेंब टाकून त्याचा सुवास घ्यावा. तेल नसल्यास बॅगेत पुदिन्याच्या गोळ्या किंवा बडीशेप-खडीसाखर ठेवल्यास उत्तम फायदा होतो.
4. बस किंवा कारमध्ये प्रवास करताना नेहमी पुढच्या सीटवर किंवा खिडकीजवळ बसावे. चालत्या गाडीत फोन वापरणे, पुस्तके वाचणे पूर्णपणे टाळा, यामुळे मेंदूचा गोंधळ अधिक वाढतो. खिडकीतून बाहेर दूरवर दिसणाऱ्या स्थिर वस्तूकडे पाहा. खिडकी थोडी उघडी ठेवून ताजी हवा आत येऊ द्या. ज्यामुळे गुदमरल्यासारखे वाटणार नाही.
♻️ ♻️
0 टिप्पण्या