मानवी शरीरातही असतं सोनं, पाहा कुठे आणि किती असतं; जाणून घ्या ते बाहेर काढता येतं का?

 

मानवी शरीरातही असतं सोनं, पाहा कुठे आणि किती असतं; जाणून घ्या ते बाहेर काढता येतं का?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/9/2026

Gold In Human Body : कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात सोनं दडलेलं असतं. पण ते आपल्याला बाहेर काढता येत नाही._ 

*Gold In Human Body :*  मानवी शरीर हे हाडं, मांस, रक्त, त्वचा आणि पाण्यापासून बनलेलं असतं. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, आपल्या शरीरात सोनं सुद्धा असतं. पण याबाबत अनेकांना माहिती नसते. आता आपल्या शरीरात _सोनं_ कुठे असतं, किती असतं आणि ते बाहेर काढता येऊ शकतं? असे प्रश्न आपल्याला पडले असतीलच. चला तर याबाबत जाणून घेऊया. कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात _सोनं_ दडलेलं असतं. पण ते आपल्याला बाहेर काढता येत नाही. 

*मानवी शरीरात किती सोनं असतं?*

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात सरासरी ०.२ मिलीग्रॅम इतकं सोनं असतं. सोन्याचं हे प्रमाण फारच कमी आहे. पण ते आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. 

*शरीरात कुठे असतं सोनं?*  

मानवी शरीरात सोनं हे रक्त, हाडं आणि त्वचेमध्ये दडून बसलेलं असतं. शरीरात असलेलं सोनं इतकं कमी प्रमाणात असतं की, ते डोळ्यांनी दिसतही नाही. हे सोनं आपल्या शरीरातील जैविक प्रक्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. ०.२ मिलीग्रॅम सोनं इतकं कमी असतं की, ते एका तांदळाच्या दाण्यापेक्षी हलकं असतं. पण ते जर एकत्र केलं गेलं तर ते सोन्याच्या एका कणा इतकं होईल. 

*मेडिकल सायन्समध्ये सोन्याच्या नॅनोकणांचा वापर* 

गेल्या काही वर्षांपासून मेडिकल सायन्समध्ये सोन्याच्या नॅनोकणांचा वापर बराच केला जात आहे. याद्वारे कॅन्सर ट्रीटमेंट आणि डायग्नोस्टिकमध्ये मदत मिळते. आपल्या शरीरातील सोनं भलेही कमी असेल, पण निसर्गाचे एक वरदान आहे. 

संकलन : यशवंत वाघ

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या