विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/9/2026 :
अवघ्या दोन दिवसांवर आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे! प्रत्येकाच्या घरी आणि सार्वजनिक मंडळात गणरायाच्या स्वागताची जोरदार पूर्वतयारी सुरू असेल; घरांची स्वच्छता झाली असून आता आरास व सजावट सुरू असेल.
सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकसारख्या अविघटनशील घटकांचा वापर करणे पूर्णपणे टाळा. ज्यांचे निसर्गात सहज विघटन होत नाही, अशा पर्यावरणास घातक गोष्टी सजावटीसाठी अजिबात वापरू नका. त्याऐवजी ताजी पाने-फुले, सुंदर कागदी फुले, पताका आणि सुबक कागदी झुंबरांचा वापर करा.
मुलांनो, गणरायाची मूर्तीसुद्धा पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचीच आणा. सर्व देवदेवतांच्या आरत्या आणि मंत्रपुष्पांजली मनोभावे पाठ करा; केवळ कॅसेट किंवा स्पिकर न लावता स्वतः मुखाने आरती म्हणा. मूर्तीचे विसर्जनही घरी मोठ्या बादलीत किंवा पालिकेच्या कृत्रिम हौदातच करा.
आपले सर्व सण साजरे करताना पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा करूया!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या