मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/9/2026 :
आपण नेहमीच असा अनुभव घेतो की, समोरची व्यक्ती जेव्हा जोरजोरात बोलत असते, आरडाओरडा करत असते किंवा भयंकर चिडलेली असते, तेव्हा आपण स्वतः शांत राहणेच अधिक शहाणपणाचे ठरते.
आपले शांत राहणे समोरच्या व्यक्तीलाही हळूहळू शांत करते. समोरच्यानेही तितक्याच जोरजोरात बोलून प्रत्युत्तर दिले, तर वादाचा आवाज अजून वाढतो; पण समोरून शांत प्रतिसाद मिळाला, तर ओरडणारा माणूस आपोआप निवळतो.
हे एक मानवी मानसशास्त्र आहे. कुठे आग लागली असेल तर तिथे तेल ओतून भागत नाही; पाण्यानेच आग विझवता येते. तसेच संतापाने लाल झालेल्या व्यक्तीशी शांततेने व संयमाने वागून तिला शांत करता येते.
आजचा संकल्प
जसे तलवारीशी ढालीच्या संरक्षणाने लढतात आणि द्वेषाला निखळ प्रेमाने जिंकतात; तसेच चिडलेल्या व्यक्तीला शांततेने सामोरे जाऊ आणि कठीण परिस्थितीही सहजतेने बदलू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या