मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/9/2026
तरुणपणी आपल्या प्रत्येकाचे जीवन चैतन्याने रसरसलेले असते. आपण सर्व जण खूप उत्साही असतो. आपल्या भोवती आपली रक्ताची, नात्यागोत्यांतील आणि आपण जोडलेली अनेक माणसे असतात; मात्र सर्वांना धरून ठेवणे व त्यांना मनापासून आपले मानणे सर्वांनाच जमते असे नाही.
काही संवेदनशील लोक मात्र सर्वांशी अत्यंत आपलेपणाने वागतात, त्यांना हवी ती सर्वतोपरी मदत करतात आणि स्वतःपेक्षा इतरांच्या गरजा भागवण्याला प्राधान्य देतात. पण अनेक लोक स्वतःची गरज संपली की साधी ओळखही दाखवत नाहीत!
अशा वेळी, "आपण मदत करून काही चूक तर केली नाही ना?" असा शल्य वाटणारा विचार मनात येतो. समोरच्याने कमालीचा कृतघ्नपणा दाखवला तर खूप पश्चात्ताप होतो व प्रचंड मानसिक त्रास होतो. "आपण निःस्वार्थपणे वागलो हे चुकले काय?" असा प्रश्न पडतो.
आजचा संकल्प
कोणासाठी आपण काही केले, तर ती त्या वेळची गरज आणि आपले कर्तव्य होते हे समजून त्या अनुभवांकडे तटस्थपणे पाहू; वर्तमानात त्या कटू आठवणी न उगाळता मन शांत ठेवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या