⏹️ निरोगी राहण्याचे नियम

 ⏹️  निरोगी राहण्याचे नियम

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/9/2026 :

वेगवान लाईफ स्टाईलमुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढत आहेत. अशात जेव्हा दवाखान्याच्या चकरा मारण्याची वेळ येते, तेव्हा कुठे आपण आरोग्याच्या बाबतीत सिरिअस होतो. मात्र अशी वेळ येऊ न देता काही पथ्य पळून आपण निरोगी राहू शकतो.

◆ रोज कमीत कमी १५ मिनिटे व्यायाम करा. शरीर निरोगी नि मन फ्रेश राहील.

◆ पुस्तके वाचत राहा. तुमच्या विचारांना योग्य चालना मिळेल.

◆ चवीला नव्हे तर पौष्टिक अन्नाला महत्त्व द्या. आहारात पालेभाज्या, फळभाज्या आणि डाळीचे प्रमाण वाढवा. 

◆ कितीही मोह झाला तरी बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. 

◆ शरीराची तसेच आजू बाजूची स्वछता ठेवा, याने रोगराई कमी होईल.

◆ आवडती गोष्ट असली तरी दोन घास कमी खाणे. जेवढी भूक आहे त्याच्या फक्त ८० टक्केच खाणे.

◆ पॅकेट मध्ये असलेले कुठलेही पदार्थ, चिप्स, बिस्कीट वगैरे न खाणे, त्या ऐवजी फळं खाणे.

◆ संध्याकाळी सात, साडे सात वाजता जेवण करून घेणे. रात्री जर भूक लागली तर एखादे फळं खाणे.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : लेट्स अप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या