आशिष जोशी.

 

आशिष जोशी.

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 7/9/2026 :

हे आहेत आशिष जोशी. भारत सरकारचे माजी अॅडीशनल सेक्रेटरी. अतिशय उच्च दर्जाचे अधिकारी. त्यांनी सरकारचा कारभार पाहिलेला असतो. केलेला असतो. काय चालू आहे, काय चालायला पाहिजे हे त्यांना माहित असतं. 31 मार्च ला ते रिटायर होतात. रिटायरमेंट नंतरचं जगणं सुरु होतं. सकाळी मॉर्निंग वॉक. सोशल मिडीयावर आपलं मत बिनधास्तपणे मांडणे. सामान्य नागरिकांचे प्रश्न ऐरणीवर आणणे. इत्यादी. त्यांचे अनेक सहकारी मात्र मोदी सरकारमध्ये अजूनही वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असतात. माहिती मिळत असते.

एक विचित्र घटना घडते. सकाळी वॉक करता असताना दिल्ली पोलिसचे दोन अधिकारी त्यांना भेटतात. ‘दो मिनिट का काम है, थोडी पुछताच करनी है’ असं सांगून सोबत घेऊन जातात. ज्ञानेशकुमार यांच्यावर केलेल्या पोस्टबद्दल माहिती हवी आहे हे सांगितलं जातं. पोलीस स्टेशनला गेल्यावर मोबाईल एरोप्लेन मोड वर टाकायला लावतात. जोशी साहेब विनंती करत असतात की, ‘घरचे लोक वाट बघत असतील.काळजी करत असतील. त्यांच्याशी तर बोलू द्या. मी पोलीसांसोबत आहे. सुखरूप आहे, एवढं तर सांगू द्या.’ पण परवानगी दिली जात नाही. ‘हमको उपरसे ऑर्डर है, वैसाही करेंगे’ अशाप्रकारे उत्तर मिळत असतं. चौकशी चालू असते. 

इकडे घरचे लोक परेशान असतात. सोबत वॉकला गेलेले अधिकारी सांगतात की पोलिसांबरोबर गेले. अनेक पोलीसस्टेशनमध्ये फोनाफोनी केली जाते. पण कुणालाच काही माहित नसतं. एवढा मोठा अधिकारी म्हणल्यावर अनेक लोक कामाला लागतात. अनेक मिडीयावाले, पत्रकार, नेते हल्लागुला करतात. पण काहीच होत नाही. शोध लागत नाही. नऊ तास हे चालू असतं. शेवटी संध्याकाळी त्यांना सोडण्यात येतं. आणि घरच्या लोकांच्या जीवात जीव येतो.    

पोलिसांच्या तावडीतून बाहेर आल्यावर जोशी साहेब परत हिमतीने आपलं म्हणणं सोशल मिडीयावर मांडतात. कारण जरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार सांगितलेलं असलं तरी प्रश्न मात्र दुसऱ्याच पोस्ट बद्दल विचारले जातात. ती पोस्ट असते गृहमंत्री अमितशहा, गृहसचिव आणि पंतप्रधान मोदी साहेबांबद्दल. विशेष म्हणजे त्या पोस्टवर सरकारने कारवाई केलेली असते. ट्वीटर [X]  ती पोस्ट आता भारतात दाखवत नाही. लोकही विसरून जातात. पण या कारवाईमुळे त्या पोस्टचे स्क्रीनशॉट आता सर्वत्र फिरत आहेत. त्यात नमूद केलेला मजकूर आता घरोघरी जात आहे. ‘अरेच्चा! असं आहे होय!’ असे उद्गार लोक काढत आहेत.   

ज्या पोस्टवरून एवढं मोठं कांड घडत आहे ती पोस्ट आहे तरी काय? तर झालं असं, जंतर मंतर वर जेन झी वर युवा मंडळीवर आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जो अत्याचार झाला त्या बद्दल जोशी साहेबांच्या कानावर काही माहिती येते. ती माहिती स्फोटक असते. ते सोशल मिडीयावर एक पोस्ट करतात. गृहसचिव आणि फिल्डवर उपस्थित असलेले इतर कनिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी तयार नसतात. पण मंत्री महोदय ऐकत नाही. मंत्री आणि सचिव यांच्यामध्ये ‘massive showdown’ होतो. आणि शेवटी कारवाई करावी लागते. म्हणजे या प्रकरणात नेमका दोषी कोण हे स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न. 

खरी गम्मत पुढेच आहे. एवढं मोठं प्रकरण झाल्यावर गृह सचिवांना परत एक्सटेन्शन नको असतं. मंत्री महोदयांना सुद्धा ते अधिकारी नको असतात. तरीही त्याच अधिकाऱ्याला एक्सटेन्शन दिलं जातं. इतक्या पावरफुल मंत्र्याचे म्हणणे टाळून परत त्या अधिकाऱ्यालाच तेथे बसवणे याचा अर्थ वाचकांनी लावायचा आहे. जास्त पावरफुल कोण हे ठरवायचे असते. Imploding – पोस्टच्या शेवटी येणारा शब्द. म्हणजे आतल्या आत कुठेतरी भयंकर स्फोट होत आहे. काहीतरी कोलमडून पडत आहे.

जोशी साहेब हे सर्व लिहून गेले. पण त्यांना ही माहिती नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली, याचा तपास सुरु झालाय. नऊ तास कसून चौकशी झाली. पण जोशी साहेब काही बधले नाही. त्यांनी त्या लोकांची नावे सांगितलीच नाही. 

सरकार कमजोर झाले किंवा सत्तेवरची त्यांची पकड ढिल्ली पडली की नोकरशाही पोलखोल करत असते, असं बोललं जातं. देवीगौडा पंतप्रधान होते तेव्हा असं सर्रास व्हायचं! 

- Dilip Lathi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या