मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/9/2026 :
आपण विविध मार्गांनी ज्ञान संपादन करत असतो. याची खरी सुरुवात घरातूनच होते; पुढे शाळेमध्ये पुस्तकी ज्ञान मिळते, जोडीला उत्तम संस्कार होतात, योग्य-अयोग्य काय ते समजते आणि व्यावहारिक व्यवहारज्ञानसुद्धा मिळते.
असे असले तरी, वेगवेगळ्या मार्गांनी मिळालेले हे सर्व ज्ञान आपण प्रत्यक्ष कृतीतून आचरणात आणतो का, हा खरा कळीचा प्रश्न आहे! अनेकदा स्वतःला विद्वान व उच्चशिक्षित समजणारे लोकही समाजात अत्यंत असंस्कृतपणे बोलताना आणि वागताना दिसतात.
याउलट, ज्यांना आपण अडाणी किंवा अशिक्षित समजतो, त्यांच्या साध्या वागण्या-बोलण्यात कमालीचा सुसंस्कृतपणा व माणुसकी दिसून येते. त्यामुळे केवळ पदव्या मिळवून सुशिक्षित होण्यापेक्षा, अंतःकरणाने सुसंस्कृत व संस्कारसंपन्न असणे अधिक महत्त्वाचे आहे.
आजचा संकल्प
आपल्या दैनंदिन व्यवहारात आपली भाषा आणि आपली कृती कोणालाही खटकणारी अथवा दुखावणारी असणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ; मिळालेल्या ज्ञानाचा सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी योग्य वापर करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या