🔰 पावसाळ्यात घराची काळजी, योग्य पद्धतीने येणे गरजेचे

 🔰 पावसाळ्यात घराची काळजी, योग्य पद्धतीने येणे गरजेचे

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/9/2026 :

_पाऊस निसर्ग पुनर्जीवित करतो. आजुबाजूचे वातावरण हिरवेगार होते. काळे ढग, गार वारा आणि पावसाचे थेंब आपल्याला अत्यंत सुख देतात. याची वाट माणसांशिवाय पशू, पक्षी, झाडे-वेली सारेच पाहात असतात. तसा हा मोसम दिलासा देणारा असतो पण सोबत अनेक त्रासही आणतो. वेळीच ते त्रास दूर करायला हवेत._

*वॉटर प्रूफिंग आवश्यक,*

घराच्या छत व भिंतींना ओल व पाणगळती पासून वाचवण्यासाठी वॉटर प्रूफिंग करवून घ्या. यामुळे छतात ओल राहणार नाही व भिंतींच्या भेगांमधून पाणी आत येणार नाही. तसेच घराचा पाया ओलाव्यापासून पूर्णपणे सुरक्षित राहील. पावसाळ्यात घरात ओल असू शकते. तसेच उन्हाअभावी कपडेही वाळत नसतात. ज्यामुळे घरात दुर्गंधी येऊ लागते. या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर करावा जेणेकरून आपले घर ताजेतवाने व सुगंधित राहील.

*ओल्या वस्तूंसाठी वेगळी जागा बनवा,*

पावसाळ्यात बाहेरून आलेल्या लोकांसोबत चिखल व ओल येण्याचा धोका असतो. विशेष करून बूट, छत्री व रेनकोटद्वारे पाणी व घाण घरात येते. हा त्रास टाळण्यासाठी घरात मुख्य दाराजवळ एक छोटासा कॉर्नर बनवा. तिथे एक मजबूत जाळीदार रॅक ठेवा. स्टील वा लोखंडी टोपलीही ठेवू शकता. ज्यात ओले बूट, चपला ठेवू शकता. याशिवाय भिंतीवर हुक वा स्टैंड लावून छत्री व रेनकोट टांगण्याची जागा बनवा. याखाली एक पोछा वा पाणी शोषणारे मॅट अंथरू शकता.

घरात ताजी हवा येणे अत्यंत आवश्यक असते. जर घरात व्हेंटिलेशन व्यवस्थित नसेल तर ओल साचू लागते. त्यामुळे भिंतींवर बुरशी, दुर्गंधी येऊ लागते. यासाठ आपण रोज थोड्या वेळासाठी खिडक्या व दारे उघडा जेणेकरून घरात ताजी हवा व प्रकाश येऊ शकेल. यामुळे घराचे वातावरण चांगले तर होतेच शिवाय बॅक्टेरिया व फंगस पासूनही बचाव होतो. जर खिडक्या नसलेली जागा असेल तर एग्झॉस्ट फॅन लावावेत.

*वायरिंग चेक करा,*

पावसाळ्यापूर्वीच हे काम करणे चांगले. केले नसेल तर आता घराचे वायरिंग व स्विचबोर्ड तपासून घ्या. कुठे वायर मोकळी असेल तर ती व्यवस्थित करवून घ्या. ओल्या हाताने स्वीचला स्पर्श करू नका. आवश्यक जागी वॉटरप्रूफ कव्हर लावावे जेणेकरून करंटपासून रक्षण होऊ शकेल. पावसाळयात कारपेट वा कापडी पायपुसणे लवकर ओले होतात. यामुळे दुर्गंधी व फंगसचा धोका राहतो. बांबू वा रबरी पायपुसणे ठेवणे उत्तम असते. ते लवकर सुकते. याची सफाई सोपी असते. मेन गेट, किचन एरिया, बाथरूम व बाल्कनीत अंथरा.

*रोपे घराबाहेर ठेवा,*

या मोसमात इनडोअर रोपांची देखभाल आवश्यक असते. या मोसमात घरात पुरेशा प्रकाश येऊ शकत नाही. यासाठी रोपे आउटडोअर ठेवण्यातच हुशारी असते. ओलाव्यात रोपांवर अनेक प्रकारचे किडे लागतात. त्यामुळे इनडोअर रोपे बाल्कनीत ठेवा. ती भिजण्यापासून वाचण्याची सोय अवश्य करा.

*प्राण्यांची देखभाल,*

पावसाळ्यात पाळीव प्राणी कोरडे व गरम राखणे अत्यंत आवश्यक असते. ओलाव्यामुळे त्यांना सर्दी लवकर होते. तेच स्किन इंफेक्शन होते. त्यांच्या राहण्याची जागा कोरडी ठेवावी व मुसळधार पावसात बाहेर काढू नये.

 ✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड

▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▬▣

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या