🔰 ॲक्सिस बँक अकलूज शाखेत श्री गणेश पूजा व आरती संपन्न
🟣 अमोल बकाल यांचा सत्कार
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/9/2026 : ॲक्सिस बँक अकलूज शाखेत स्थापन केलेल्या श्री गणेशाची सायंकाळची पूजा आणि आरती अकलूज पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार अमोल बकाल व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या हस्ते संपन्न झाली.
याप्रसंगी अमोल बकाल यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा बँक मॅनेजर अजित बारबोले, पोलीस समीर पठाण यांच्या हस्ते सत्कार होऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ॲक्सिस बँक मॅनेजर अजित बारबोले, गिरीश प्रभाकर शेटे, अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सचिन चव्हाण, समीर पठाण, नितीन गायकवाड, राम गोरे, समाधान एकतपुरे, मकरंद एकतपुरे, तुषार गायकवाड, अतुल भिताडे, सुशांत पराडे, सुशांत कदम इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या