⏹️ घशातील जंतुसंसर्ग
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
घशाचा दाह किंवा घशात खवखवणे या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते. घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर पांढरे चट्टे उठणे किंवा त्यावर पस तयार होणे ही फॅरिन्जायटिसची सामान्य लक्षणे आहेत. हा त्रास होत असताना शरीर सुद्धा ह्या इन्फेक्शनची ताप, खोकला, नाक सतत वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, शिंका, मळमळ किंवा उलटी होणे ही लक्षणे दाखवत असते. मोठी माणसे हे सगळे काही प्रमाणात सहन करू शकतात, पण लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच गिळताना त्रास होतो आणि त्यामुळे सतत तोंडातून लाळ गळत असते.
*घरगुती उपाय*
◆ घशाची सूज उतरण्यासाठी गरम पाणी पिण्याचे व हळद मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या.
◆ सुंठ, गवती चहा, ज्येष्ठमध, हळद, पुदिना यांचा चहा करा, लिंबू पिळून प्यावे.
◆ घशाला झालेले इन्फेक्शन घालवण्यासाठी पेरूचे पान उपयुक्त आहे. ते चाऊन अथवा उकळून रस प्यावा.
◆ थंडीत घशाचे इन्फेक्शन होणे ही सामान्य समस्या आहे. याच्या जोडीला ताप, सर्दी होते. वाफ घेणे हा यावरील सोपा उपाय आहे. घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो. दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते.
◆ घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशावेळी गरम काढा प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. काढा मध्ये तुळस, लवंग, आले घातल्यास घशासाठी तो उपयुक्त होतो. असा काढा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो.
◆ दोन मिऱ्याची पुड, किंचित हळद, किंचीत काथाची पुड मधात घ्यावी.
◆ काथाची फुड गरम पाण्यात घेतल्यास घसा सुटतो.
◆ गरम पाण्यात एक लिंबू रस घ्यावा.
◆ लसणाची पाकळी पिठी साखरेत घालून खावी.
◆ मध व जेष्ठीमध पावडर, हळद, कोरफडीचा गर आवाजा साठी एकत्र करून चाटावा. दोन वेळा.
◆ घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा. त्यामुळे लवकरआराम मिळेल.
◆ आल्याचे चार तुकडे, दोन टोमॅटो, मध यांचा रस करुन प्यावा.
◆ पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडया थोड्या वेळाने प्यावे.
◆ मधात काही लवंगा टाका. काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा. लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
◆ पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा. त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्यावे.
◆ लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले कोमट पाणी प्यावे.
◆ पुरेसा आराम करावा. व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.
*आयुर्वेदिक उपाय*
◆ खदिरादी वटी एक एक गोळी खडीसाखरे सोबत. यामुळे घसा सुजणे, पडजीभ सुजणे, ढास लागणे, घशातील खवखव, खरखर, कफ न सुटणे, घसा लाल होणे यात आराम मिळतो.
◆ एलादी वटी एक एक चार वेळा घेतल्यास लवकर फरक पडतो.
◆ पोटातील अन्नरस घशात येऊन जळजळ आग आग होत असेल, तर जेवल्यानंतर अर्धा चमचा अविपत्तीकर चुर्ण थंड पाण्यात घ्या. सोबत प्रवाळपंचामृत एक एक गोळी पाव कप दूधात घ्या.
डॉ. प्रमोद ढेरे
सौजन्य : निसर्ग उपचार तज्ञ
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
0 टिप्पण्या