शंकरराव मोहिते पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार २०२६-२७ चे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/9/2026 :
शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रीसर्च शंकरनगर अकलूज अभियांत्रिकी महाविद्यालयांत महाविद्यालय स्तरावरील आविष्कार २०२६ या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये समाज उपयोगी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. ही संशोधन स्पर्धा महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली होती. अशी माहिती स्पर्धेचे उद्घाटक प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकांचे जीवन सुलभ व सुकर होईल असे प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन याप्रसंगी बोलताना त्यांनी केले.
या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील जवळपास ५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्या पैकी बारा स्पर्धकांचे विद्यापीठाच्या विभागीय स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती अविष्कार चे महाविद्यालयाचे संयोजक प्रा. अनिल कोकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांनी ह्युमॅनिटी अँड फाईन आर्ट्स, कॉमर्स मॅनेजमेंट लॉ, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी, प्युअर सायन्स, ग्रीकल्चर अँड ऍनिमल हसबंडरी आदी विभागामध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. या स्पर्धेमध्ये प्राचार्य भारत साठे व प्रा. डॉ. मुकुंद गाडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सदर स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव सुहास यादव व प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


0 टिप्पण्या