विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/9/2026 :
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज भाद्रपद शुद्ध तृतीया व चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने हरतालिका पूजन आणि गणेशचतुर्थी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे आज महिला व मुली हरतालिकेचे पूजन करून उपवास करतील आणि सर्व जण मिळून भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करतील.
लाडक्या बाप्पासाठी घरात आणि मंडळात छान पर्यावरणपूरक सजावट केली ना? सजावट करताना अवाजवी गर्दी न करता ती सुटसुटीत असावी. पूजा करताना, दुर्वा-फुले वाहताना बाप्पाच्या नाजूक मूर्तीला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्या.
मुलांनो, पूजेचे धार्मिक विधी मोठ्या माणसांना जबाबदारीने करू द्या; तुम्ही बाजूला उभे राहून शांतपणे निरीक्षण करा. मोठे झाल्यावर आपल्यालाच ही पवित्र परंपरा पुढे चालवायची आहे. दुर्वा स्वच्छ निवडून त्याची २१ दुर्वांची जुडी बांधायला शिका, तालात टाळ वाजवायला शिका आणि सर्वांना प्रेमाने खिरापत वाटा.
श्रीगणेश ही बुद्धी आणि चौसष्ट कलांची आराध्य देवता आहे; बाप्पाच्या चरणी सदैव सुबुद्धी मागा!
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या