सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभियंता दिन उत्साहात संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/9/2026
शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. १५/९/२०२६ रोजी अभियंता दिन सर्व विभागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांनी दिली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम. एस. ई. डी. सी. एल. अकलूजचे उपकार्यकारी अभियंता स्वानंद शंकर शिंदे यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आपल्या बुद्धिमत्ता, शिस्त, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या जोरावर देशाच्या विकासात अतुलनीय योगदान दिले. त्यांचे जीवन प्रत्येक अभियंत्यासाठी प्रेरणादायी आहे.अभियांत्रिकी ही केवळ पदवी मिळविण्याची शाखा नाही, तर समाजाच्या समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाय शोधण्याची जबाबदारी आहे. आजच्या काळात तंत्रज्ञान अतिशय वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, हरित ऊर्जा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
या दिनानिमित्त सर्व विभागामध्ये रोबोरेस, टेक्निकल पोस्टर प्रेसेंटेशन, टेक्निकल गेम्स, क्युज कॉम्पिटिशन, ट्रेझर हंट, गेस द गॅझेट, इ स्पोर्ट त्यामध्ये फ्री फायर आणि बी जी एम आय इत्यादी विविध टेक्निकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. पांढरे एस.डी. तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले.

0 टिप्पण्या