⏹️ खडी साखर नि वेलची

 ⏹️  खडी साखर नि वेलची 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अनेक एक महत्वाचा घरगुती उपाय म्हणजे वेलची नि खडी साखर यांचे मिश्रण. यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात. हृदयरोग, पोटाच्या समस्या, अ‍ॅसिडिटी, अपचन, इन्फेक्शन पासून वाचण्यासाठी यांचं सेवन केलं जाऊ शकतं.

*इम्यूनिटी वाढते* : वेलचीत अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि आवश्यक ऑईल भरपूर असतं, ज्याने इम्यूनिटी वाढवण्यास मदत मिळते. यातील बॅक्टेरिअल गुणांमुळे शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शन पासून बचाव होतो. तेच खडी साखर नॅचरल थंडावा आणि इंस्टेंट एनर्जीचं काम करते. या दोन्ही गोष्टी मिक्स केल्यास इम्यूनिटी मजबूत होते, ज्यामुळे ताप, सर्दी, खोकला या समस्या होत नाहीत.

*वजन कमी होतं* : वेलचीत मेटाबॉलिज्म बूस्ट करण्याची क्षमता असते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. वेलची मधील काही तत्व अन्न पचन होण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीरात चरबी वाढत नाही. 

*डायजेशन* : वेलची खडी साखरेचं एकत्र सेवन केल्याने पचन तंत्र मजबूत होतं. वेलचीने डायजेस्टिव एंझाइम अ‍ॅक्टिव करणे, डायजेशन सुधारणे, अपचन, सूज आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच जेवण पचनक्रिया चांगली होते.

*खडी साखर नि वेलचीचे फायदे*

# जेव्हा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचा विषय येतो तेव्हा वेलची फायदेशीर ठरते.

# योग्य प्रमाणात सेवन केल्याने खडी साखरेमुळे इलेक्ट्रोलाइट संतुलित राहण्यास मदत मिळते.

# वेलची मधील आवश्यक तेलामुळे मेंदू शांत होतो आणि मूडही चांगला होतो.

# अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असल्याने वेलची फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करते. हे फ्री रॅडिकल्स त्वचेसाठी आणि शरीरासाठी घातक असतात.

*वेलची आणि खडी साखरेचं सेवन*

# एक ग्लास कोमट पाण्यात चिमुटभर बारीक केलेली वेलची पावडर आणि थोडी खडी साखर मिक्स करा. सकाळी याचं सेवन केल्यास दिवसभर फ्रेश वाटेल.

# जेवण केल्यावर खडी साखरेच्या एका तुकड्या सोबत वेलचीचं सेवन करा.

# आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चहात वेलची आणि खडी साखर टाका.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या