विचारधारा

 


विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 28/9/2026 :

स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा विषय केवळ वहीत निबंध लिहिण्यासाठी किंवा पुस्तकात वाचण्यासाठी नसतो; तर स्वच्छता ही स्वतः अनुभवण्याची आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष जगण्याची गोष्ट असते. तसा शाळकरी मुलांचा स्वच्छतेशी संबंध जरा कमीच असतो; आपण आवरतो कमी, पण पसारा मात्र भरपूर करतो!

अभ्यास झाला की दप्तर आणि पुस्तके तशीच विखुरलेली राहतात; सकाळी झोपेतून उठलो की अंथरूण-पांघरूण तसेच पडलेले असते. चप्पल आणि शूज तर कधीच जागेवर जात नाहीत; एका पायाचा मोजा इथे, तर दुसरा भलतीकडेच कुठे तरी पडलेला असतो!

मुलांनो, पुन्हा जेव्हा नेमकी तीच वस्तू हवी असते, तेव्हा मात्र आपण शोध न घेता थेट आईला हाक मारतो; "सापडत नाही, कुठे आहे?" म्हणून घर डोक्यावर घेतो. कारण आपल्याला पक्की खात्री असते की आईनेच ती उचलून जागेवर ठेवली असेल. असे किती दिवस आईला विनाकारण त्रास देणार? जी वस्तू जिथून आणि जशी घेतली, ती वापरून झाल्यावर अगदी तशीच पूर्ववत जागेवर ठेवण्याची शिस्त स्वतःला लावून घ्या ना!

स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि स्वावलंबन हे उत्तम गुण याच वयात मनापासून अंगी बाणवून घ्या!

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या