विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 7/9/2026 :

तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचत असाल किंवा दूरदर्शनवरील बातम्या पाहत असाल; सर्वांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र सरकारने डीजे, डॉल्बी आणि घातक लेझर किरणांच्या वापरावर कडक बंदी घातली आहे.

कर्णकर्कश ध्वनीचा आणि तीव्र लेझर लाईटचा मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम इतका भयानक आहे की निष्पाप लोक कायमचे बहिरे किंवा अंध होत आहेत; काहींना तर थेट प्राणासच मुकावे लागत आहे. असे भीषण वास्तव समोर असताना काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा हा घातक अट्टाहास कशासाठी?

मुलांनो, जर गणेशोत्सव 'सार्वजनिक' आहे, तर तो कसा साजरा करायचा आणि मिरवणूक कशी काढायची हे ठरवण्याचा समान अधिकार सर्व नागरिकांचा आहे ना? संपूर्ण समाजाला वेठीस धरून केवळ चार-सहा जणांनी स्वतःचे चुकीचे विचार सर्वांवर का लादावेत?

तुम्हाला काय वाटते? उत्सवात प्रत्येकाच्या निरोगी आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा आदर व्हायलाच हवा, बरोबर ना?

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या