शिक्षक असण्याची ताकद !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/9/2026
१९९४ सालची गोष्ट - भारताचे राष्ट्रपती श्री. शंकर दयाल शर्मा अधिकृत दौर्यावर मस्कतला गेले होते.जसे एअर इंडियाचे विमान मस्कत विमानतळावर उतरले तेव्हा आश्चर्याने चकीत व्हावे असे काही घडले.
ओमानचे सुलतान कोणत्याही देशातील मान्यवरांना विमानतळावर जाऊन कधीही स्वतः स्वागत करत नसत – कधीच नाही. पण या वेळेस त्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवले आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या स्वागताला ते स्वतः विमानतळावर गेले ! विमान उतरल्यावर ओमानचे सुलतान स्वतः विमानाच्या पायऱ्या चढून आत गेले आणि राष्ट्रपतींना त्यांच्या आसनावरून सोबत घेऊन खाली उतरले.
विमानातून उतरल्यावर राष्ट्रपतींसाठी चालकासह गाडी उभी होती. पण सुलतानांनी चालकाला बाजूला होण्यास सांगितले आणि स्वतः गाडी चालवत राष्ट्रपतींना घेऊन गेले !
नंतर पत्रकारांनी विचारले की एवढे सारे प्रोटोकॉल मोडून का स्वागत केले, तेव्हा सुलतानांनी उत्तर दिले –
“मी श्री. शर्मा यांचे भारताचे राष्ट्रपती म्हणून स्वागत करायला विमानतळावर गेलो नव्हतो. मी भारतात शिक्षण घेतले आहे आणि बरेच काही शिकलो. पुण्यात शिकत असताना श्री. शर्मा माझे शिक्षक होते – म्हणून मी असे केले !”
ही आहे शिक्षक असण्याची ताकद !
शब्द-क्षितिज

0 टिप्पण्या