जिल्हास्तरीय कुस्ती व ज्युदो स्पर्धेत लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींचे यश
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर ची विद्यार्थिनी कु.सई प्रवीण वाघ हिने सरकोली ता. पंढरपुर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगट,४२ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला ,तसेच निमगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत कु.मयुरी मारुती काळे 17 वर्षे वयोगट 57 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यांची अनुक्रमे विभागीय कुस्ती व ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते- पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते - पाटील, संचालिका तथा प्रशालेच्या सभापती कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील ,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे, स्थानिक प्रशाला समितीचे सर्व सदस्य, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पवार यांनी खेळाडू ,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

0 टिप्पण्या