⏹️ गुणकारी आरोग्यदायी मुळा

 ⏹️  गुणकारी आरोग्यदायी मुळा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/9/2026 :

मुळा खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. एका मुळ्यात पौष्टिक तत्वे भरपूर आढळतात. कॅलरी, फॅट, डायट्री फायबर, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, शर्करा आणि व्हिटॅमिन-सी मिळते. शरीरातील घाण बाहेर काढून किडनीला चांगले ठेवण्याचे काम मुळ्याचे असते. पोट दुखत असल्यास हे उत्तम काम करते. पचन संस्थेत बिघाड झाल्यास मुळा खाल्ल्याने आराम मिळतो. 

भूक लागत नाही अश्या वेळेस मुळाच्या रसात आल्याचा रस आणि लिंबाचा रस टाकून प्यायल्याने भूक वाढते. मुळा पोटासाठी लाभदायी असतो. मुळाच्या रसाच्या सेवनाने पोटाचे अनेक आजार दूर होतात. ताजा मुळा खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पोटात जडपणा असल्यास मुळाच्या रसात मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो. पोटाचे आजार दूर होतात. यकृत तंत्राच्या बिघाडामुळे होणाऱ्या आजारां पासून मुळ्याचे सेवन केल्याने त्वरित आराम मिळतो. मुळाचे नियमित सेवनाने यकृत (लिव्हर) उत्तमरीत्या कार्य करते.

कावीळ असल्यास मुळा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. उच्चदाबाला म्हणजेच हाय ब्लडप्रेशर असणाऱ्यांना ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी मुळा लाभकारी आहे. ह्यात अँटी हायपरटेन्सिव्ह चे गुणधर्म असतात. तसेच मुळ्यात पॉटेशियम आढळतं. मुळा शरीरातील मॅसोडियम आणि पॉटेशियमच्या स्तराला नियंत्रित ठेवतं जेणे करून ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. मुळ्याचा आहारात समावेश करावा जेणे करून आरोग्यावर उत्तम परिणाम होतील, परंतू ज्यांना कफाचा आणि वाताचा त्रास असेल त्यांनी मुळा टाळावा.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या